• कोल्हापुरात १९ किंवा २५ ऑगस्टला होणार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
कोल्हापूर :
दिवंगत आमदार कै. पी. एन. पाटील यांचे दोन्ही सुपुत्र जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील व केडीसीसी बँकेचे संचालक राजेश पाटील यांच्यासह कै. पी. एन. पाटील गटाचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे. मुंबईमध्ये राहुल पाटील यांनी कै. पी. एन. पाटील गटाच्या प्रमुख नेतेमंडळी व कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हेही उपस्थित होते. कोल्हापुरात उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या उपस्थितीत १९ किंवा २५ ऑगस्टला समारंभपूर्वक हा पक्षप्रवेश होणार आहे.
यावेळी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह, केडीसीसी बँकेचे संचालक राजेश पाटील, करवीर पंचायत समितीचे माजी सभापती बी. एच. पाटील, गोकुळ दूध संघाचे संचालक बाळासाहेब खाडे, भोगावती साखर कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, गोकुळ दूध संघाचे माजी संचालक पी. डी. धुंदरे, गोकुळ दूध संघाचे माजी संचालक सत्यजित पाटील, कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक भारत पाटील-भुयेकर, काँग्रेस पक्षाचे करवीर तालुकाध्यक्ष शंकरराव पाटील, भोगावतीचे साखर कारखान्याचे संचालक ए. डी. चौगुले, माजी जिल्हा परिषद सदस्य चेतन पाटील, हंबीरराव वळके, गणेश आडनाईक आदी प्रमुख उपस्थित होते.
राहुल पाटील यांनी घेतली अजितदादा पवार यांची भेट
Mumbai
overcast clouds
28.2
°
C
28.2
°
28.2
°
80 %
6.8kmh
100 %
Fri
28
°
Sat
28
°
Sun
29
°
Mon
28
°
Tue
28
°