Homeसामाजिककोल्हापूरात वंध्यत्वासंदर्भातील सर्वांगीण शास्त्रीय परिषद 

कोल्हापूरात वंध्यत्वासंदर्भातील सर्वांगीण शास्त्रीय परिषद 

कोल्हापूर :
वंध्यत्व हा एक गंभीर आणि वाढता आरोग्यविषयक प्रश्न असून, यावर योग्य निदान व उपचाराची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर इंडियन सोसायटी ऑफ असिस्टेड रिप्रॉडक्शन (इसार) महाराष्ट्र राज्य शाखा यांच्या अध्यक्षतेखाली आणि कोल्हापूर ऑब्स्टेट्रिक्स अ‍ॅण्ड गायनेकॉलॉजी सोसायटी (केओजीएस) यांच्या सहभागाने १२ व १३ जुलै २०२५ रोजी हॉटेल सयाजीमध्ये वंध्यत्व विषयक दोन दिवसीय शास्त्रीय परिषद आयोजित करण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र शाखेच्या अध्यक्षा डॉ. पद्मारेखा जिरगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी डॉ. शिशिर जिरगे उपस्थित होते.
डॉ. पद्मारेखा जिरगे यांनी सांगितले की, या परिषदेचे उदघाटन १२ जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजता शिवाजी विद्यापीठ कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. किरण कुर्तकोटी असतील. या परिषदेमध्ये स्त्री व पुरुष वंध्यत्व, हार्मोनल असंतुलन, आधुनिक उपचारपद्धती (आयव्हीएफ, आययूआय), जनुकीय चाचण्या आणि नवीनतम तंत्रज्ञान यांसारख्या वंध्यत्वाच्या सर्व पैलूंवर सखोल चर्चा होणार आहे.
राज्यभरातील आणि देशपातळीवरील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ, एम्ब्रायलॉजिस्ट, युरोलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्ट आणि या क्षेत्रातील अग्रणी संशोधक मार्गदर्शन करणार आहेत. नवोदित डॉक्टर व वैद्यकीय व्यावसायिकांसाठी ही परिषद एक मौल्यवान शैक्षणिक संधी ठरणार आहे.
डॉ. पद्मारेखा जिरगे व केओजीएसच्या अध्यक्षा डॉ. मनीषी नागवकर यांनी सांगितले की, या परिषदेमुळे कोल्हापूरमधील स्त्रीरोगतज्ज्ञांना जागतिक दर्जाचे ज्ञान आणि तंत्रज्ञान समजून घेण्याची संधी मिळणार आहे. या परिषदेत केओजीएसचा सक्रिय सहभाग असून, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व स्त्रीरोगतज्ज्ञांमध्ये या विषयाबाबत एकसंध जनजागृती घडवून आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या परिषदेत डॉ. नंदिता पालशेतकर, डॉ. अमित पतकी, डॉ. केदार गणला सचिव, एमएसआर, आणि डॉ. तानाजी पाटील सहआयोजक सचिव केओजीएस, तसेच डॉ. रणजित किल्लेदार सचिव केओजीएस, डॉ. साधना पटवर्धन, डॉ. चैतन्य शेंबेकर, डॉ. सतीश पतकी, डॉ. मिलिंद पिशवीकर आणि डॉ. प्रविण हेन्द्रे हे सहभागी होणार आहेत.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
scattered clouds
27.6 ° C
27.6 °
27.6 °
81 %
4.5kmh
38 %
Fri
28 °
Sat
28 °
Sun
28 °
Mon
28 °
Tue
28 °

Most Popular

You cannot copy content of this page