कोल्हापूर :
संजय घोडावत आयआयटी व मेडिकल अकॅडमीच्या उत्कर्षा हळींगळे या विद्यार्थीनीने NEET-2025 परीक्षेत ७२० गुणांपैकी ६३३ गुण मिळवून चमकदार कामगिरी केली. तिने ऑल इंडिया रँक १९३ व कॅटेगरी रँक ४५ प्राप्त करून संपूर्ण देशात संजय घोडावत आयआयटी व मेडिकल अकॅडमीचे नाव उंचावले आहे.
तसेच संस्थेच्या सृष्टी कदम (६१५ गुण, ऑल इंडिया रँक ६२७), आदित्य फातले (६०६ गुण, ऑल इंडिया रँक ९८६ ), श्रेया पवार (६०५ गुण, ऑल इंडिया रँक १०३१), विकास चौधरी (६०० गुण, ऑल इंडिया रँक १३६९) यांनीही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. संस्थेच्या ५ विद्यार्थ्यांनी ६०० तर १०७ विद्यार्थ्यांनी ५०० च्या वरती गुण मिळवून उच्चत्तम निकालाची परंपरा कायम राखली आहे.
या यशाबद्दल बोलताना संस्थेचे संचालक श्री वासु म्हणाले की, दूरदृष्टी आणि दृढनिश्चय हि यशाची गुरुकिल्ली आहे. संस्था चेअरमन संजय घोडावत व विश्वस्त विनायक भोसले यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
——————————————————-
संजय घोडावत आयआयटी व मेडिकल अकॅडमीच्या उत्कर्षा हळींगळेची चमकदार कामगिरी
RELATED ARTICLES
Mumbai
haze
25
°
C
25
°
25
°
69 %
0kmh
0 %
Sun
26
°
Mon
28
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
28
°

