अपेडाच्या माध्यमातून गुळ निर्यातीस चालना मिळावी : डॉ. सुभाष घुले
कोल्हापूर :
गुळ उत्पदकांनी गुळ निर्यात करण्याकरीता अपेडाचे माध्यमातून प्रयत्न करावे. भौगोलिक मानांकन अतर्गत वैयक्तिक गुळ उत्पादकांनी नोंदणी करणे अवश्यक असल्याने गुळ उत्पादकांनी जी आय नोंदणी करावी, जेणेकरून कोल्हापूरी गुळ जगभरात पोहोचण्यास मदत होईल. याबाबत कृषी पणन मंडळाच्या योजनांचा फायदा गूळ उत्पादकांनी घ्यावा. तसेच पणन मंडळाच्या योजनांबाबतची माहिती पणन मंडळ कोल्हापूरचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, कोल्हापूर व अपेडा मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि.३०) इंजिनिअरिंग असोसिएशन हॉल, उद्यमनगर, कोल्हापूर येथे गुळ निर्यात कार्यशाळा पार पडली. कार्यक्रमाचे उदघाटन डॉ. विद्यासागर गेडाम, प्रमुख गुळ संशोधन केंद्र, कोल्हापूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पांडूरंग बामने, सहाय्यक व्यवस्थापक अपेडाचे पांडुरंग बामने, उपसरव्यवस्थापक, पणन मंडळ कोल्हापूर डॉ. सुभाष घुले, कृषि विज्ञान केंद्र कणेरीचे प्रा. पांडूरंग काळे, गुळ निर्यातदार दिपक जोशी व बाळासाहेब पाटील, पणन मंडळाचे अधिकारी ओंकार माने, प्रसाद भुजबळ, सत्यजित भोसले, सुयोग टकले, व गुळ उत्पादक उपस्थित होते.
अपेडाचे पांडुरंग बामने यांनी अपेडाच्या योजना, निर्यात क्षेत्रातील संधी, गॅप प्रमाणपत्र, गुळाची मागणी, गुळ प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन केले. प्रा. पांडुरंग काळे यांनी गुळ उत्पादन वाढीबाबत व त्याच्या प्रतवारी बाबत मार्गदर्शन केले. उत्तम प्रतीचा गूळ कसा तयार करावा याबाबत डॉ. गेडाम यांनी मार्गदर्शन केले. गुळ निर्यातदार दिपक जोशी व बाळासोहेब पाटील यांनी गुळ उत्पादकांनी कोमिकल विरहीत उत्तम प्रतीचा गुळ उपलब्ध करून दिल्यास कोल्हापूर गुळाची निर्यात करू असे नमुद केले. तसेच विविध देशाचे प्रतवारी मानके काय आहेत याबाबत मार्गदर्शन केले.
गूळ उत्पादक शेतकऱ्यांनी सेंद्रिय करणे बाबत प्रश्न उपस्थित केला, यावर श्री. बामने यांनी याबाबत शेतकर्यांनी अपेडाकडे संपर्क केल्यास त्याबाबत मदत केली जाईल असे सांगितले.
कार्यशाळेस सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील गुळ उत्पादक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पणन मंडळाचे ओंकार माने यांनी केले. प्रा. पांडूरंग काळे केविके कन्हेरी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
अपेडाच्या माध्यमातून गुळ निर्यातीस चालना मिळावी
Mumbai
overcast clouds
27.4
°
C
27.4
°
27.4
°
83 %
7.9kmh
100 %
Wed
27
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
28
°
Sun
28
°