HomeUncategorizedआजपासून महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेचा थरार!

आजपासून महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेचा थरार!

कोल्हापूर :
महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) २०२५ स्पर्धेचा थरार बुधवार (दि.४) पासून महाराष्ट्र क्रिकेट संघटना, गहुंजे येथील मैदानावर रंगणार आहे. अदानी समूहाचे मुख्य प्रायोजकत्व लाभलेल्या आणि महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने आयोजित केलेल्या या स्पर्धेत क्रिकेटशौकिनांना टी-२० क्रिकेटचा आनंद घेता येणार आहे. बुधवारी (दि.४) रत्नागिरी जेट्स विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स यांच्यात सलामीची लढत होईल.
महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग (डब्लूएमपीएल) स्पर्धेला दि.५ जूनपासून प्रारंभ होणार असून एमपीएल आणि डब्लूएमपीएल या दोन्ही स्पर्धांचा शानदार उदघाटन समारंभ ४ जून रोजी सायंकाळी आहे. लोकप्रिय अभिनेत्री चित्रांगदा सिंग हिची उपस्थिती आणि नेत्रदीपक ड्रोन शो ही उदघाटन समारंभाची खास आकर्षणे ठरणार आहेत. समाजातील विविध क्षेत्रांमधील नामवंत व्यक्ती यावेळी उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार म्हणाले की, सर्वसामान्य क्रिकेट प्रेमींनाही या उच्च दर्जाच्या भरपूर आनंद घेता यावा याकरिता सर्व प्रेक्षकांना सर्व सामन्यांसाठी विनामूल्य प्रवेश देणार आहे. महाराष्ट्रातील गुणवान व उदयोन्मुख क्रिकेटपटूना पाठिंबा व प्रोत्साहन देण्यासाठी प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने स्टेडियममध्ये उपस्थित रहावे असे आवाहन आम्ही करीत आहोत.

आज, बुधवार, 4जून रोजी सलामीच्या लढतीत रत्नागिरी जेट्स विरुद्ध इगल नाशिक टायटन्स यांच्यात लढत रंगाने असून त्यामुळे या स्पर्धेचा रंगतदार प्रारंभ होईल अशी अपेक्षा आहे.

RELATED ARTICLES
Mumbai
broken clouds
29.1 ° C
29.1 °
29.1 °
79 %
10.3kmh
78 %
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °
Fri
29 °
Sat
29 °

Most Popular