HomeUncategorizedSIP मध्ये महिन्याला 1 हजार रुपये गुंतवून तुम्ही करोडो कमवू शकता का?...

SIP मध्ये महिन्याला 1 हजार रुपये गुंतवून तुम्ही करोडो कमवू शकता का? SIP बद्दलच्या सर्व प्रश्नांची उत्तरं

‘200 रुपयांची गुंतवणूक करा आणि करोडपती व्हा..’ अलीकडे सोशल मीडिया वेबसाईट्सवर बऱ्याच ठिकाणी आपल्याला SIP संबंधीच्या अशाच काही जाहिराती पाहायला मिळतात.

म्युच्युअल फंडमध्ये SIP गुंतवणूक करून असं भरीव उत्पन्न मिळू शकतं असं सांगितलं जातं.

पण ही गुंतवणूक योजना काय आहे?

यातून खरोखरच पैसे कमावता येतात का?

एसआयपी (SIP) म्हणजे काय? एसआयपी (SIP) म्हणजे सिस्टीमॅटिक इंव्हेस्टमेंट प्लॅन. ही गेल्या काही काळातील सर्वाधिक लोकप्रिय गुंतवणूक योजना आहे.

म्युच्युअल फंडमध्ये पद्धतशीरपणे गुंतवणूक करण्याचा हा एक मार्ग आहे.

याद्वारे, प्रत्येक महिन्याला विशिष्ट म्युच्युअल फंड कंपनी तुमच्या बँक खात्यातून पैसे कापून घेते. वेगवेगळ्या स्टॉक मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपनीच्या स्टॉक्समध्ये हे पैसे गुंतवून कंपनी तुम्हाला परतावा देते.

SIP मध्ये दोन प्रकारची गुंतवणूक असते आर्थिक सल्लागार आणि वॉनक्र्यू या संस्थेत चीफ फायनान्शियल ऑफिसर असणारे सतीश कुमार सांगतात, एसआयपी गुंतवणूक योजनेत दोन प्रकारचे पर्याय असतात.

“एसआयपीचे दोन प्रकार आहेत. एक आहे तो ग्रोथ फंड आणि दुसरा म्हणजे डिव्हिडंड फंड.

“तुमच्या ग्रोथ फंडातील गुंतवणुकीतून मिळणारा लाभांश ठराविक कालावधीसाठी गुंतवून शेवटी फायदा मिळवला जातो. पण डिव्हिडंड फंड गुंतवणुकीत तुम्हाला महिन्यातून एकदा, दर तीन महिन्यांनी एकदा आणि वर्षातून एकदा लाभांश मिळू शकतो.”

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
28.8 ° C
28.8 °
28.8 °
80 %
10.1kmh
100 %
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
29 °

Most Popular