HomeUncategorizedशिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय हॉकी स्पर्धेत विवेकानंद महाविद्यालय विजेते

शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय हॉकी स्पर्धेत विवेकानंद महाविद्यालय विजेते

कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आणि विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर आयोजित शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय पुरुष हॉकी स्पर्धेत यजमान विवेकानंद महाविद्यालयाने निर्विवाद वर्चस्व गाजवत अजिंक्यपद पटकावले.
चुरशीच्या अंतिम सामन्यात विवेकानंद महाविद्यालयाने स. ब. खाडे महाविद्यालय, कोपार्डेच्या संघाचा ३-० असा एकतर्फी पराभव करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करणाऱ्या विवेकानंदच्या खेळाडूंनी सामन्यावर पूर्ण नियंत्रण ठेवले आणि ३-० च्या फरकाने दणदणीत विजय मिळवला.
या यशाबद्दल विजेत्या खेळाडूंना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे आणि संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांचे मोलाचे प्रोत्साहन लाभले. ही संपूर्ण स्पर्धा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे व प्र. प्राचार्य डॉ. सी. बी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली.
स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विवेकानंद महाविद्यालयाचे माजी जिमखाना विभागप्रमुख मेजर एम. जी. गायकवाड , प्रा. किरण पाटील, जिल्हा हॉकी असोसिएशनचे अध्यक्ष विजय साळोखे सरदार उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या आणि उपविजेत्या संघांना चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाच्या निवड समितीचे अध्यक्ष डॉ. विकास जाधव आणि सदस्य म्हणून रणजीत इंगवले आणि संदीप पाटील यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. विकास जाधव यांनी केले. पाहुण्यांची ओळख प्रा. समीर पठाण यांनी करून दिली, तर प्रा. प्रशांत कांबळे यांनी आभार मानले. स्पर्धेच्या नियोजनासाठी  महाविद्यालयाचे रजिस्ट्रार एस. के. धनवडे यांचे मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले. प्रशासकीय सेवक सुरेश चरापले यांनी विशेष परिश्रम घेतले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
25 ° C
25 °
25 °
57 %
0kmh
5 %
Sat
28 °
Sun
29 °
Mon
29 °
Tue
30 °
Wed
30 °

Most Popular

You cannot copy content of this page