Homeकला - क्रीडाटेनिस अजिंक्यपद स्पर्धेत १२ देशांतील खेळाडू झुंजणार

टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत १२ देशांतील खेळाडू झुंजणार

कोल्हापूर :
डेक्कन जिमखाना आयोजित व आयटीएफ, एआयटीए, महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना आणि पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या गद्रे सीफूडस-डेक्कन जिमखाना-एमएसएलटीए आयटीएफ जे १०० कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत १२ देशांतील अव्वल कुमार खेळाडू सहभागी झाले आहे. यामध्ये मुलांच्या गटात कोरियाच्या वानमिन किम याला तर मुलींच्या गटात जपानच्या आओई वातानाबे यांना अग्रमानांकन देण्यात आले आहे. ही स्पर्धा डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे दि. २८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२६ या कालावधीत रंगणार आहेत.
याविषयी अधिक माहिती देताना स्पर्धेचे संचालक आणि डेक्कन जिमखान्याचे टेनिस विभागाचे सचिव डॉ. विक्रांत साने म्हणाले की, यंदाच्या वर्षी या स्पर्धेत भारत, कोरिया, जपान, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, ग्रेट ब्रिटन, रशिया, न्यूझीलंड, उझबेकिस्तान, अमेरिका, नॉर्थ मॅसिडोनिया, फ्रांस या १२ देशांतील खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.
तसेच, घरच्या मैदानावर खेळत असल्यामुळे भारतीय खेळाडूंना महत्वपूर्ण आयटीएफ गुण मिळवण्याची संधी या स्पर्धेच्या माध्यमातून मिळणार आहे. स्पर्धेतील एकेरीतील मुले व मुलींच्या गटातील विजेत्या खेळाडूला एमव्ही देव स्मृती करंडक आणि १०० आयटीएफ गुण, तर उपविजेत्या खेळाडूला ६० आयटीएफ गुण देण्यात येणार आहेत. दुहेरीतील विजेत्यांना ७५ आयटीएफ गुण, तर उपविजेत्या ४५ आयटीएफ गुण देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वैशाली शेकटकर यांची आयटीएफ सुपरवायझर म्हणून निवड करण्यात आली आहे. स्पर्धेच्या मुख्य फेरीच्या सामन्यांना दि. ३० नोव्हेंबरला सुरूवात होणार असून पात्रता फेरीचे सामने २८ व २९ नोव्हेंबर या दिवशी होणार आहेत. गतवर्षी या स्पर्धेत मुलांच्या गटात भारताच्या गौतम वेंकटरमण याने तर, मुलींच्या गटात अल्बिना काकीनोव्हा हिने विजेतेपद संपादन केले होते.
स्पर्धेतील खेळाडूंची मानांकन यादी पुढीलप्रमाणे आहे.
मुले- १) वॉनमिन किम (दक्षिण कोरिया), २) टे वू किम (दक्षिण कोरिया), ३) रिकू नाकामोटो (जपान), ४) तविश पाहवा (भारत), ५) प्रतीक नवीन (ऑस्ट्रेलिया), ६) शौर्य भारद्वाज (भारत), ७) मन्नान अग्रवाल (भारत), ८) ल्यूक जी झी हो (सिंगापूर).
मुली- १) आओई वातानाबे (जपान), २) तात्याना गोलोविना (रशिया), ३) दिया रमेश (भारत), ४) एलिझावेता नालेस्नी (रशिया), ५) लिसा अन्झाई (जपान), ६) यश्विथा रेड्डी (न्यूझीलंड), ७) हरिता श्री व्यंकटेश (भारत), ८) दीपशिखा विनयागमूर्ती (भारत).
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
30 ° C
31 °
28.9 °
54 %
3.1kmh
18 %
Thu
29 °
Fri
28 °
Sat
28 °
Sun
29 °
Mon
29 °

Most Popular

You cannot copy content of this page