कोल्हापूर :
‘नॉट मी, बट यू’ या ब्रीदवाक्याचा संदेश देत समाजसेवा, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रसेवेची भावना जागृत करण्याच्या उद्देशाने डॉ. डी. वाय. पाटील बी.टेक. ॲग्री महाविद्यालय, तळसंदे येथे राष्ट्रीय सेवा योजना (एन. एस. एस.) स्थापना दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
‘नशामुक्त युवा अभियान’ अंतर्गत घेण्यात आलेल्या पोस्टर निर्मिती स्पर्धेत विद्यार्थ्यांनी व्यसनाचे दुष्परिणाम, व्यसनमुक्त समाजाची गरज आणि निरोगी जीवनशैली याबाबत प्रभावी संदेश चित्रांच्या माध्यमातून मांडले. यामध्ये मृणाल व्हरमबळे व विधी रोकडे यांनी विजेतेपद मिळवले. या स्पर्धेचे परीक्षण डॉ. पी. एस. बंडगर, एस. एम. पाटील आणि एस. बी. माळी यांनी केले.
‘नॉट मी, बट यू’ या ब्रीदवाक्याचा अर्थ आणि एन. एस. एस. मधील अनुभव वीरेन लगारे, रोहिणी गंगधर, पल्लवी खरात आणि चैत्राली देशमुख यांनी विद्यार्थ्यांनी मनोगतातून मांडले.
उपप्राचार्य इंजि. पी. डी. उके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, समाजासाठी कोणत्याही अपेक्षेशिवाय निःस्वार्थ भावनेने कार्य करण्याचे आवाहन केले. एन. एस. एस. चे ब्रीदवाक्य कृतीत उतरविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
यानंतर ‘नशामुक्त युवा अभियान’ तर्गत जनजागृती रॅली व पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी घोषवाक्ये आणि पथनाट्याच्या माध्यमातून व्यसनाचे दुष्परिणामाबात जागृती केली.
कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य व कॅम्पस डायरेक्टर प्रा. डॉ. एस. बी. पाटील यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमासाठी एस. ए. इंगवले यांचे मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन पृथ्वीराज निकम यांनी तर मृणाल कुंभार यांनी आभार मानले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
——————————
डॉ. डी. वाय. पाटील बी.टेक. ॲग्रीमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन साजरा
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
27.9
°
C
27.9
°
27.9
°
81 %
6.9kmh
99 %
Thu
28
°
Fri
29
°
Sat
28
°
Sun
28
°
Mon
28
°

