• डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस येथे प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे स्वागत
कोल्हापूर :
विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेऊन डी. वाय. पाटील समूह कार्यरत आहे. विद्यार्थ्यांना ज्ञान, कौशल्य, आत्मविश्वास देतानाच विविध कौशल्यविकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यावर संस्थेचा भर आहे, असे प्रतिपादन डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसचे संचालक डॉ. एस. आर. पावसकर यांनी केले.
डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस येथे आयोजित प्रथम वर्ष विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात ते बोलत होते. डॉ. पावसकर म्हणाले की, गेल्या १४ वर्षांपासून टेक्निकल कॅम्पसच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत सातत्याने स्थान मिळविले आहे. महाविद्यालयाला ‘नॅक’चे ‘ए’ मानांकन प्राप्त झाले असून शिवाजी विद्यापीठाकडून स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा मिळाला आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी शांतादेवी डी. पाटील मेरिट स्कॉलरशिप दिली जाते. विद्यार्थ्यांनी उपलब्ध असलेल्या प्रत्येक संधीचा उपयोग करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करावी, असे आवाहन डॉ. पावसकर यांनी यावेळी केले.
शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. आर. एस. पवार यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम, विभाग, शैक्षणिक सुविधा आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या संधींची माहिती दिली. ‘शाश्वत ज्ञान – कोर्स फॉर लाईफ’ संस्थेचे संचालक जिनी जॉर्ज यांनी व्यक्तिमत्त्व विकास आणि जीवनातील यशासाठी आवश्यक कौशल्यांबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी प्रथम वर्ष विभागप्रमुख डॉ. विशाल सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. केदार सहस्रबुद्धे यांनी केले. सहाय्यक रजिस्ट्रार जितेंद्र पोवार, डॉ. हमीद नायकवडी, प्रा. रवी सातपुते, प्रा. केदार रेडेकर, प्रा. श्रीकांत नांगरे यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शसंस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील आणि कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
——————————
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय : डॉ. एस. आर. पावसकर
RELATED ARTICLES
Mumbai
moderate rain
25
°
C
25
°
25
°
94 %
2.6kmh
100 %
Sun
27
°
Mon
28
°
Tue
28
°
Wed
28
°
Thu
28
°

