Homeशैक्षणिक - उद्योग विवेकानंद महाविद्यालयात बौद्धिक संपदा हक्क विषयक आंतरराष्ट्रीय कार्यशाळा उत्साहात

विवेकानंद महाविद्यालयात बौद्धिक संपदा हक्क विषयक आंतरराष्ट्रीय कार्यशाळा उत्साहात

कोल्हापूर :
विवेकानंद महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि संशोधन विकास कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बौद्धिक संपदा हक्क, पेटंट, कॉपीराइट व ट्रेडमार्क अर्ज प्रक्रिया’ या विषयावर विशेष आंतरराष्ट्रीय कार्यशाळा उत्साहात पार पडली. संशोधकांना बौद्धिक संपदा हक्कांविषयी सखोल माहिती मिळावी तसेच पेटंट, कॉपीराइट आणि ट्रेडमार्क अर्ज प्रक्रिया प्रत्यक्ष समजून घेता यावी, हा कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. या कार्यशाळेचे ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पातळीवर आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेस हेनान विद्यापीठ (चीन) येथील प्रा. शान्हू लिऊ हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. तसेच डॉ. डी. टी. डोंगळे (शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर) आणि प्रा. डॉ. पी. यू. लांडे (राजाराम कॉलेज) यांनीही मार्गदर्शन केले. या प्रमुख पाहुण्यांनी बौद्धिक संपदा हक्कांचे महत्त्व, संशोधनातील त्याची गरज तसेच पेटंट व नोंदणी प्रक्रियेतील बारकावे याविषयी आपले विचार मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे हे होते.
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात बौद्धिक संपदा हक्क, पेटंट, कॉपीराइट आणि ट्रेडमार्क यासंदर्भातील विविध बाबींची सविस्तर माहिती देण्यात आली. दुसऱ्या सत्रात सहभागी संशोधकांना अर्ज प्रक्रिया व नोंदणीबाबत प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाचा संशोधकांना मोठ्या प्रमाणात लाभ झाला.
कार्यशाळेत ऑनलाईन आणि ऑफलाईन २१६ संशोधकांनी सहभाग नोंदविला. त्यापैकी ऑनलाईन १३४ आणि ऑफलाईन ७६ इतके होते.संशोधकांनी कॉपीराइटसाठी, ३४ तर ८ संशोधकांनी पेटंटसाठी अर्ज दाखल केले असून ४६ संशोधक प्रत्यक्ष प्रात्यक्षिक प्रक्रियेत सहभागी झाले. या कार्यशाळेस कोरीया आणि चीन या देशातील संशोधक सहभागी झाले होते. तसेच देशातील इतर राज्यातील संशोधकही  सहभागी झाले होते.
याप्रसंगी प्रा. डॉ. सी. बी. पाटील यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुप्रिया पाटील यांनी केले. प्रास्ताविक डॉ. बी. टी. दागंट यांनी केले तर समारोपाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शुभांगी काळे यांनी केले. आभार डॉ. अतिश पाटील यांनी मानले.
कार्यशाळेचे समन्वयक म्हणून डॉ. शुभांगी काळे आणि डॉ. संजय लठ्ठे, प्रमुख, संशोधन विकास केंद्र यांनी काम पाहिले. कार्यक्रमाच्या संयोजनासाठी डॉ. सचिन कुलकर्णी, डॉ. विशाल वाघमारे, डॉ. आर. वाय. पाटील, डॉ. इरफान मुजावर, डॉ. अमेय पाटील, प्रा. रवी सुतार, प्रा. अश्विनी शिंदे, सागर कांबळे आणि नामदेव माने यांनी विशेष परिश्रम घेतले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
scattered clouds
29 ° C
29 °
29 °
74 %
3.6kmh
35 %
Wed
29 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
28 °
Sun
27 °

Most Popular

You cannot copy content of this page