• पशुधन आरोग्य, शैक्षणिक व तांत्रिक सेवांबाबतच्या सामंजस्य कराराबाबत चर्चा
कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) व सिद्धगिरी पशुवैद्यकीय महाविद्यालय, कणेरी यांच्यात पशुवैद्यकीय सेवा, शैक्षणिक प्रशिक्षण आणि तांत्रिक सहकार्याच्या दृष्टीने प्रस्तावित सामंजस्य कराराबाबत बैठक झाली. गुरुवारी गोकुळ दूध संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात झालेली ही प्राथमिक बैठक गोकुळचे प्रशासकीय सदस्य डॉ. चंद्रकांत परुळेकर, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, सिद्धगिरी पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. मुरगेप्पा, प्रा. डॉ. मार्कंडेय यांच्या उपस्थितीत पार पडली.
बैठकीत सिद्धगिरी पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना गोकुळच्या माध्यमातून गायी-म्हैशींचे आरोग्य व्यवस्थापन, आजारांचे निदान, उपचार पद्धती, लसीकरण, कृत्रिम रेतन, प्रगत प्रजनन तंत्रज्ञान, वैरण विकास तसेच संतुलित पशुखाद्य निर्मिती व दुग्ध व्यवसायातील विविध तांत्रिक बाबींचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्याबाबत चर्चा करण्यात आली. दूध उत्पादकांना अधिक प्रभावी पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आधुनिक निदान सुविधा, तज्ज्ञांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याबाबतही विचारविनिमय झाला. गोकुळची दुग्ध व्यवसायातील अग्रगण्य सहकारी संस्था म्हणून असलेली ओळख व दूध उत्पादकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा विचार करून सिद्धगिरी पशुवैद्यकीय महाविद्यालयाने प्रस्ताव सादर केल्याचे नमूद करण्यात आले.
या प्रस्तावित सहकार्यामुळे गोकुळमार्फत दूध उत्पादकांना उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या पशुवैद्यकीय सेवांना आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनांची जोड मिळण्यास मदत होईल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष क्षेत्रातील अनुभव मिळून भविष्यात कुशल पशुवैद्यकीय तज्ज्ञ घडण्यास हातभार लागणार आहे.
बैठकीत झालेल्या चर्चेच्या आधारे प्रस्तावित सामंजस्य कराराचा विषय गोकुळ दूध संघाच्या प्रशासकीय मंडळाच्या आगामी बैठकीसमोर विचारार्थ सादर करण्यात येणार असून, त्यानंतर करारासंदर्भातील सर्व कायदेशीर बाबी, संघाच्या पोटनियमातील तरतुदी तसेच आवश्यक प्रक्रिया तपासून प्रशासकीय मंडळाच्या निर्णयानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
बैठकीस गोकुळचे प्रशासकीय सदस्य डॉ. चंद्रकांत परुळेकर, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, सिद्धगिरी पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. मुरगेप्पा, प्रा. डॉ. मार्कंडेय, प्रा. डॉ. राऊतमारे, प्रा. डॉ. योगी, प्रा. डॉ. परिहार, महाव्यवस्थापक अनिल चौधरी, व्यवस्थापक पशुसंवर्धन डॉ. दयावर्धन कामत, व्यवस्थापक पशुखाद्य डॉ. व्ही. डी. पाटील, व्यवस्थापक प्रशासन रामकृष्ण पाटील, रमेश पाटील, डॉ. एम. पी. पाटील, संग्राम मगदूम, मृण्मयी सातवेकर यांच्यासह संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
——————————
‘गोकुळ’ व सिद्धगिरी पशुवैद्यकीय महाविद्यालय सहकार्याबाबत प्राथमिक बैठक
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28
°
C
28
°
28
°
81 %
8.5kmh
90 %
Thu
28
°
Fri
28
°
Sat
29
°
Sun
28
°
Mon
28
°

