Homeकला - क्रीडाआंतरराष्ट्रीय स्टेडियमसाठी लवकरच करार : संभाजीराजे छत्रपती

आंतरराष्ट्रीय स्टेडियमसाठी लवकरच करार : संभाजीराजे छत्रपती

• केडीसीएचा वार्षिक पारितोषक व खेळाडू गौरव समारंभ उत्साहात
कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन (केडीसीए)ला लवकरच हक्काचे मैदान मिळणार आहे. विकासवाडी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम विकसित करण्यासाठी राज्य शासनाकडून ३० एकर जागा ९० वर्षांच्या कराराने मिळणार आहे. ९० वर्षाच्या मुदतीसाठी केला जाणारा हा करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांच्या उपस्थित होणार आहे, असे कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष व माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केडीसीए आयोजित क्रिकेट स्पर्धाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात जाहीर केले.
धैर्यप्रसाद हाॅल येथे कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन सन २०२५-२६ चा वार्षिक पारितोषक वितरण समारंभ राजाराम कॉलेजचे प्राचार्य डाॅ. अनिता बोडके, न्यु इन्स्टिटयुट ऑफ टेक्नाॅलाॅजी (एनआयटी) प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व संभाजीराजे छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला.
सन २०२५-२६ या वर्षामध्ये कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे घेण्यात आलेल्या कै. मुरलीधर सोमाणी १९ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा कै बाबा भोसले करंडक अ गट कै. माजी आम. दिनकारराव यादव स्पर्धा, श्री वसंतराव चौगुले ब गट ट्राॅफी, कै विलास (मेजर) यादव टी-२० क गट ट्राॅफी,  महाजन ­ कदम ग्रामीण टी-२० ट्राॅफी, पाठारे १६ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा, १४ वर्षाखालील कॅलेक्स रायझिंग स्पर्धा व  कै. लक्ष्मी रंगराव पाटील महिला एकदिवशीय स्पर्धा या सर्व स्पर्धांचा एकत्रीत पारितोषक वितरण समारंभ करण्यात आला. त्याचबरोबर अनुजा पाटील, श्वेता माने, रणजीत निकम, अभिषेक निषाद, श्रेयस चव्हाण, यतीराज पाटोळेे, अभिषेक आंब्रे, राजदिप मंडलिक या खेळाडूंची राज्यस्तरीय संघामध्ये निवड झाल्याबद्दल प्रमाणपत्र स्मृतीचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविण्यात करण्यात आला.
महिला खेळाडूंला प्रोत्साहन मिळावे हया उद्देशाने नव्याने सुरू केलेला उत्कृष्ट महिला खेळाडू कै. प्रतापसिंह शिंदे (तोरगलकर) यांच्या स्मरणार्थ अमॄता शिंदे (माजी महिला कसोटी खेळाडू) यांच्या मार्फत दहा हजार रुपये व स्मृतीचिन्ह सई यवलुस्कर हिला प्रदान केले.
राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सातत्यपुर्ण कामगिरी केलेल्या अनुजा पाटील, सेजल सुतार, अभिषेक निषाद, क्षितीज पाटील, श्रेयस चव्हाण, वैभव पाटील, ओम पाटील यांना कै. डी. एन. उर्फ बाबा इंगळे यांच्या स्मरणार्थ इंगळे परिवारातर्फे विशेष प्रोत्साहनपर बक्षिस रोख रक्कम स्वरूपात देण्यात आले.
कै. बाबा भोसले यांच्या स्मरणार्थ श्री भोसले कुंटुबियांकडुन देण्यात येणारा उदयोन्मुख खेळाडू (बेस्ट ज्युनियर प्लेयर) पुरस्कार प्रज्वल सं. पाटील याला शैलेश भोसले व अभिजीत भोसले यांच्या हस्ते देवून गौरविण्यात आले. यावेळी विविध स्पर्धांमध्ये विजेतेपद व उपविजेतेपद मिळविलेल्या संघाना कायम स्वरूपी ट्राॅफी प्रमुख पाहुणे व मान्यवर पुरस्कर्ते यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक डाॅ. अनिता बोडके, डाॅ. संजय दाभोळे, कॅप्टन डाॅ. नितीन सोनजे तसेच संभाजीराजे छत्रपती यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास अभिषेक सोनी, संजयबाबा यादव, शैलेश भोसले कुंटुबीय, चंद्रकांत महाजन, अशोकराव पाटील, वैभव पाटील, एन. एन. पाटील, बापूसाहेब मिठारी, विनोद डुंणुग, इंद्रजित चव्हाण, नितीन सावडेऀकर, प्रसाद पत्की आदींसह चेतन चौगुले, शीतल भोसले, रमेश हजारे, केदार गयावळ, जनार्दन यादव, अजित मुळीक, कॄष्णात धोत्रे, रोहन भुईंबर, राजेश केळवकर, किरण रावण, नितीन पाटील, रहीम खान, साद मुजावर, ज्योती काटकर, संस्थेचे सभासद, खेळाडू, सर्व स्थानिक क्लबचे प्रतिनिधी, प्रशिक्षक, तालुका प्रतिनिधी, पंच स्कोरर व पालक वर्ग उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत व सुत्रसंचालन संस्थचे जाॅ. सेक्रेटरी डाॅ. संजय पाठारे यांनी प्रास्ताविक संस्थेचे सचिव मदन शेळके यांनी केले. आभार स्पर्धा कमिटी अध्यक्ष कॄष्णा धोत्रे यांनी मानले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
28.2 ° C
28.2 °
28.2 °
76 %
7.9kmh
100 %
Tue
29 °
Wed
29 °
Thu
29 °
Fri
29 °
Sat
29 °

Most Popular

You cannot copy content of this page