• मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले दर्शन
कोल्हापूर :
संपूर्ण देशातील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या कोल्हापूरच्या अंबाबाई महालक्ष्मी शक्तीपीठाला आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कुटुंबासह दर्शनासाठी उपस्थिती लावली. मंदिराच्या कामाच्या शुभारंभ कोनशिलेचे उद्घाटन करण्यापूर्वी त्यांनी पत्नी सोनल शहा यांच्यासोबत दर्शन घेतले.
दक्षिण भारतातील महत्त्वपूर्ण देवस्थान असणाऱ्या व साडेतीन शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ म्हणून श्रध्देय असणाऱ्या या मंदिराप्रति केंद्रीय मंत्री अमित शाह यांची श्रद्धा सर्वश्रुत आहे. आज मंदिरात आगमन झाल्यानंतर त्यांनी मंदिर परिसरात सुरु असलेल्या विकास कामांकडे लक्ष देत नव्याने बसवण्यात आलेल्या सुवर्णकलशाकडे देखील लक्ष वेधले. मंदिराच्या दुरुस्ती व सुशोभीकरणाची माहिती त्यांनी घेतली.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्रशिक्षण चंद्रकांतदादा पाटील, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, अन्य मंत्री तसेच अमित शाह यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. विजय राठोड यांनी श्री अंबाबाई महालक्ष्मीची प्रतिमा, शाल व श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत केले.
——————————
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सपत्नीक घेतले श्री अंबाबाई महालक्ष्मीचे दर्शन
Mumbai
clear sky
30.8
°
C
30.8
°
30.8
°
63 %
4.9kmh
7 %
Sat
31
°
Sun
31
°
Mon
30
°
Tue
29
°
Wed
30
°

