राजर्षी शाहू संशोधन केंद्राच्या प्रभारी संचालकपदी डॉ. मंजुश्री पवार
कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू संशोधन केंद्राच्या प्रभारी संचालकपदी इतिहास संशोधक डॉ. मंजुश्री पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांच्या हस्ते डॉ. पवार यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, डॉ. अरुंधती पवार, उपकुलसचिव डॉ. वैभव ढेरे उपस्थित होते.
ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी राजर्षी शाहू महाराजांचे विचार, कार्य आणि इतिहास यांचा सखोल अभ्यास व संशोधन केले. त्या कार्याचा वारसा रक्तातच असल्याने डॉ. मंजुश्री पवार या पदाला निश्चितपणे न्याय देतील, असा विश्वास कुलगुरू डॉ. कामत यांनी या प्रसंगी व्यक्त केला.
ते म्हणाले, डॉ. जयसिंगराव पवार यांनी राजर्षी शाहू संशोधन केंद्राच्या माध्यमातून संशोधनाची एक भक्कम परंपरा निर्माण केली. त्यांच्या कार्याचा ठसा विद्यापीठाच्या शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रावर कायम राहील. डॉ. मंजुश्री पवार सरांचा वैचारिक वारसा पुढे नेत केंद्राच्या कार्याला नवी दिशा देतील. राजर्षी शाहू महाराजांचे विचार, सामाजिक न्यायाची भूमिका आणि संशोधनपर उपक्रम अधिक व्यापक करण्यासाठी त्या निश्चितपणे योगदान देतील.
डॉ. पवार यांचा राजर्षी शाहू महाराज यांच्याविषयीचे संशोधन, इतिहास आणि सामाजिक परिवर्तनाच्या विचारांचा वारसा जपण्याचा प्रयत्न निश्चितपणे करेन, अशी ग्वाही देताना डॉ. मंजुश्री पवार म्हणाल्या, राजर्षी शाहू संशोधन केंद्राशी डॉ. पवार यांचे भावनिक नाते होते. त्यांनी आयुष्यभर जपलेले संशोधन, इतिहासाची चिकित्सा आणि शाहू विचारांचा प्रसार यांचा वारसा पुढे नेण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी भावनिक, सन्मानाचा आणि तितकाच जबाबदारीचा क्षण आहे. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करत केंद्राच्या कार्याला अधिक गतिमान करण्यासाठी प्रयत्नशील राहीन.
——————————
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28.2
°
C
28.2
°
28.2
°
81 %
7kmh
78 %
Tue
29
°
Wed
29
°
Thu
29
°
Fri
29
°
Sat
29
°

