• ‘व्हॅल्यू स्ट्रीम मॅपिंग फॉर लीन इम्प्लिमेंटेशन इन स्मॉल अँड मिडीयम इंटरप्राईजेस’ या पुस्तकाचे प्रकाशन
कोल्हापूर :
डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. महादेव नरके यांचे ‘व्हॅल्यू स्ट्रीम मॅपिंग फॉर लीन इम्प्लिमेंटेशन इन स्मॉल अँड मिडीयम इंटरप्राईजेस’ हे संशोधनपर पुस्तक अभियांत्रिकी विद्यार्थी तसेच संशोधकांसाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी व्यक्त केला.
डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी आपल्या संशोधन आणि अभ्यासूवृत्तीतून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त असे ‘व्हॅल्यू स्ट्रीम मॅपिंग फॉर लीन इम्प्लिमेंटेशन इन स्मॉल अँड मिडीयम इंटरप्राईजेस’ या पुस्तकाची निर्मिती केली आहे. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते व विश्वस्त ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी कुलगुरू डॉ. राकेशकुमार शर्मा, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, सीएचआरओ श्रीलेखा साटम, डॉ. महादेव नरके यांचे वडील मारुती नरके, आई शांताबाई नरके, पत्नी मधुरा नरके, मुलगी आदिती नरके, पुतणे अमृत नरके आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. संजय डी. पाटील म्हणाले की, डॉ. महादेव नरके यांनी अतिशय खडतर प्रवासातून शिक्षण घेत आई वडिलांच्या कष्टाचे चीज केले आहे. आज त्यांचे हे पुस्तक प्रकाशित होत आहे याचा मनस्वी आनंद होत आहे. हे पुस्तक विद्यार्थ्यांसह, अभ्यासकानाही मार्गदर्शक ठरेल याची खात्री आहे.
विश्वस्त ऋतुराज पाटील म्हणाले, डॉ. नरके यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून महत्वपूर्ण विषयावर लिखाण केले आहे. यातील संशोधन आणि केस स्टडी या औद्योगिक अभ्यासासाठी सहाय्यभूत ठरतील, असे सांगून त्यांनी डॉ. नरके यांना शुभेच्छा दिल्या.
लेखक डॉ. महादेव नरके म्हणाले की, पीएचडीसाठी संशोधन करत असताना या विषयातील संदर्भ ग्रंथांची आवश्यकता पाहून या पुस्तकाची निर्मिती झाली. कोणत्याची उत्पादनाच्या निर्मितीमध्ये कॉस्ट कटिंग, टाईम मॅनेजमेंट, रॉ टू फिनिश मॅपिंग अशा सर्व टप्प्याची माहिती यामध्ये देण्यात आली आहे. आई-वडिलांनी शिक्षणाला महत्त्व दिले म्हणून आपण घडलो. या सर्व प्रवासात डॉ. डी. वाय. पाटील, डॉ. संजय डी. पाटील. आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील यांचासह पाटील कुटुंबाचे मोठे योगदान व पाठबळ लाभले.
यावेळी डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकचे उपप्रचार्य नितीन माळी, रजिस्ट्रार महेश रेणके, डॉ. पी. के. शिंदे, शितल साळोखे, अक्षय करपे, अजय बंगडे यांच्यासह प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. प्रा, राज आलासकर यांनी सूत्रसंचालन केले तर आदिती महादेव नरके हिने आभार मानले.
——————————
डॉ. महादेव नरके यांचे पुस्तक विद्यार्थी आणि संशोधकांसाठी दिशादर्शक : डॉ. संजय डी. पाटील
RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
28.4
°
C
28.4
°
28.4
°
69 %
3.5kmh
0 %
Mon
29
°
Tue
30
°
Wed
31
°
Thu
31
°
Fri
32
°

