Homeकला - क्रीडाजागतिक योगासन स्पर्धेतील पदकप्राप्त खेळाडूंचा सत्कार

जागतिक योगासन स्पर्धेतील पदकप्राप्त खेळाडूंचा सत्कार

कोल्हापूर :
पहिल्या जागतिक योगासन स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील वृंदा भुतडा हिने सुवर्णपदक, निवेश पाटील याने दोन सुवर्णपदक तसेच रोहित चव्हाण याने रौप्यपदक संपादन केले. या पदकप्राप्त खेळाडूंचा सत्कार जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आला.
भारतीय संस्कृतीत योगाला असलेले महत्त्व यामध्ये, पहिल्या जागतिक योगासन स्पर्धेत कोल्हापूरच्या खेळाडूंनी मिळवलेले यश हे अत्यंत कौतुकास्पद आहे. खेळामध्ये कोल्हापूर अग्रगण्य राहील यासाठी खेळाडूंना आवश्यक त्या पायाभूत सुविधा व सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले.  जागतिक योगासन स्पर्धेमध्ये पदकप्राप्त विजेत्यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते.

४ ते ८ जून दरम्यान ट्रांस स्टडिया स्टेडीयम, अहमदाबाद (गुजरात) येथे संपन्न झालेल्या पहिल्या जागतिक योगासन स्पोर्टस चॅम्पियन स्पर्धेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील तीन खेळाडूंची भारतीय संघात निवड झाली होती. या स्पर्धेत सीनियर ब गटात सुपाईन या प्रकारात रोहित चव्हाण याने तर ज्युनिअर गटात वृंदा भुतडा हिने फाँरवर्ड बेंडिंग व निवेष पाटील याने सब ज्युनिअर गटात फाँरवर्ड बेंडिंग व पारंपरिक सांघिक स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेत वृंदा भुतडा हिने सुवर्णपदक, निवेश पाटील याने दोन सुवर्णपदक तसेच रोहित चव्हाण याने रौप्यपदक संपादन केले.
स्पर्धेत प्राविण्य प्राप्त खेळाडू व त्यांचे प्रशिक्षक राज्य क्रीडा मार्गदर्शक रविभुषण कुमठेकर व सुहास पवळे यांचा सत्कार जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड  यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी क्रीडा व युवक सेवा, कोल्हापूर विभागाचे उपसंचालक सुहास पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, कोल्हापूर जिल्हा गुरुप्रसाद योग परिषद, इचलकरंजी व सरदार तालीम मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
31 ° C
31 °
29.9 °
66 %
3.1kmh
12 %
Wed
30 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
29 °
Sun
29 °

Most Popular

You cannot copy content of this page