• बॅडमिंटन स्पर्धेत सहा मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का
कोल्हापूर :
पुणे जिल्हा मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन संघटनेच्या (पीडीएमबीए) यांच्या वतीने आयोजित भारतीय बॅडमिंटनमधील अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘व्ही.व्ही. नातू मेमोरियल योनेक्स-सनराईज अखिल भारतीय मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत २०२६ स्पर्धेत महिला गटात अक्षिता, श्रीयांशी परदेशी, गार्गी सैकिया, प्रशंसा बोनम, आध्या शाइन यांनी तर, पुरुष गटात ध्यान संतोष यांनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत आजचा दिवस गाजवला.
भारतीय बॅडमिंटन संघटना आणि महाराष्ट्र बॅडमिंटन संघटना यांच्या मान्यतेखाली वेदांत स्पोर्ट्स अकॅडमी, ताथवडे, पुणे येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये पहिल्या फेरीत महिला गटात उत्तरप्रदेशच्या अक्षिताने दुसऱ्या मानांकित महाराष्ट्राच्या श्रुती मुंदडाचा २१-१६, २१-६ असा तर, मध्यप्रदेशच्या श्रीयांशी परदेशीने हरियाणाच्या जिया रावतचा २३-२१, २१-१६ असा पराभव करून आगेकूच केली. तेलंगणाच्या प्रशंसा बोनम हिने पाचव्या मानांकित राजस्थानच्या साक्षी फोगटचा १९-२१, २४-२२, २१-१२ असा पराभव केला. आसामच्या गार्गी सैकियाने केरळच्या तेराव्या मानांकित पवित्रा नवीनचा २१-१९, १८-२१, २१-१९ असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. केरळच्या आध्या शाइन हिने महाराष्ट्राच्या पंधराव्या मानांकित तनिष्का देशपांडेचा २१-१५, २१-१४ असा पराभव केला.
पुरुष गटात कर्नाटकच्या बिगर मानांकित ध्यान संतोष याने चौथ्या मानांकित तेलंगणाच्या रोहन कुमार आनंददास राज कुमारचे आव्हान २१-१३, २१-१६ असे संपुष्टात आणले. महाराष्ट्राच्या क्रिश देसाई याने चंदीगढच्या समरवीरला १६-२१, १४-४ असे नमविले.
अक्षिता, श्रीयांशी, गार्गी, प्रशंसा, आध्या आणि ध्यान संतोष यांचे विजय
RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
27.8
°
C
27.8
°
27.8
°
81 %
7.8kmh
94 %
Sun
28
°
Mon
29
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
28
°

