कोल्हापूर :
शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीगच्या सी डिव्हीजन स्पर्धेत लक्षतीर्थ फुटबॉल क्लबने दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात त्यांनी मोहन मलबारी तरुण मंडळचा २-० अशा गोलफरकाने पराभव केला. यासह लक्षतीर्थ आणि मोहन मलबारी हे दोन्ही संघ पुढील हंगामातील बी डिव्हीजनसाठी पात्र ठरले आहेत.
कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन (केएसए) आयोजित या स्पर्धेत एकूण ७४ संघांनी सहभाग घेतला होता. १९ गटांमध्ये विभागलेल्या संघांदरम्यान प्राथमिक फेरीत १०८ सामने खेळविण्यात आले. प्रत्येक गटातील अव्वल संघ अशा १९ संघांनी बाद फेरीत प्रवेश मिळविला. त्यांच्यामध्ये बाद पध्दतीचे सामने खेळले गेले. त्यातून चार संघ उपांत्य फेरीत दाखल झाले.
लक्षतीर्थ फुटबॉल क्लब, यादवनगर फुटबॉल क्लब, मोहन मलबारी तरुण मंडळ, बजापराव माने तालीम मंडळ या संघांनी उपांत्य फेरी गाठली. यामध्ये लक्षतीर्थने यादवनगरवर विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला. तसेच मोहन मलबारी संघाने बजापराव माने तालीम मंडळवर मात करून अंतिम फेरी गाठली.
लक्षतीर्थ फुटबॉल क्लब आणि मोहन मलबारी तरुण मंडळ यांच्यात विजेतेपदासाठी लढत झाली. त्यामध्ये लक्षतीर्थने २-० गोलने विजय मिळवून विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत एकूण १२६ सामने खेळले गेले.
छत्रपती शाहू स्टेडियमवर अंतिम सामन्यानंतर बक्षीस वितरण समारंभ पार पडला. विजेत्या व उपविजेत्या संघांना श्रीमंत यशराजराजे छत्रपती यांच्या हस्ते चषक प्रदान करण्यात आले. यावेळी केएसएचे ऑन.फुटबॉल सेक्रेटरी राजेंद्र दळवी, नितीन जाधव, विश्वंभर मालेकर, सी-डिव्हिजन प्रमुख दीपक घोडके व प्रदीप साळोखे उपस्थित होते.
सी डिव्हीजन फुटबॉल स्पर्धेत ‘लक्षतीर्थ’ विजेता
RELATED ARTICLES
Mumbai
moderate rain
28.2
°
C
28.2
°
28.2
°
82 %
8kmh
82 %
Sun
29
°
Mon
29
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
28
°

