Homeशैक्षणिक - उद्योग संजय घोडावत विद्यापीठाच्या ९०० हुन अधिक विद्यार्थ्यांची इंटर्नशिप पूर्ण

संजय घोडावत विद्यापीठाच्या ९०० हुन अधिक विद्यार्थ्यांची इंटर्नशिप पूर्ण

कोल्हापूर :
संजय घोडावत विद्यापीठाने ‘औद्योगिक क्षेत्राच्या बदलत्या आवश्यकतेनुसार इंडस्ट्री रेडी ग्रॅज्युएट्स व बिझनेस रेडी प्रोफेशनल्स तयार करणे’ हे ध्येय समोर ठेवून अभ्यासक्रमाची आखणी औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेऊन केली आहे. त्यानुसार विद्यापीठातील सर्व विभागातील विद्यार्थ्यांना इंडस्ट्री इंटर्नशिप पूर्ण करणे अनिवार्य आहे.
२०२५-२६ या शैक्षणिक वर्षात एम. टेक, एमबीए, एमसीए, एम. एस. सी बी. टेक, बीबीए, बीसीए, बी. कॉम. बी फार्म, डी फार्म, इ. विभागातील अंतिम वर्षाच्या सुमारे ९०० हुन अधिक विद्यार्थ्यांची देशभरातील विविध नामांकित उद्योगांमध्ये इंटर्नशिपसाठी निवड झाली होती. या सर्व विद्यार्थ्यांनी आपली इंटर्नशिप यशस्वीपणे पूर्ण केली आहे. विद्यार्थ्यांना देशभरातील नामांकित कंपनी व प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेता आला.
निवडक विद्यार्थ्यांना इंटर्नशिपदरम्यान दरमहा रुपये ५००० ते २०,००० पर्यंत स्टायपेंड देण्यात आले. काही विद्यार्थ्यांची ‘इंटर्नशिप विथ प्लेसमेंट’ अंतर्गत निवड झाली असून, इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर त्यांना संबंधित कंपनीत नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.
विद्यार्थ्यांच्या इंटर्नशिपसाठी विद्यापीठात ‘इंडस्ट्री युनिव्हर्सिटी रिलेशन्स’ विभाग कार्यरत असून, संचालक डॉ. नितीन पुजारी, सर्व विभाग समन्वयक, विभाग प्रमुख व प्राध्यापक यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले. यशस्वी विद्यार्थ्यांचे  विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू प्रा. डॉ. उद्धव भोस्ले, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे यांनी अभिनंदन केले.

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
28.2 ° C
28.2 °
28.2 °
80 %
9.2kmh
94 %
Sat
28 °
Sun
28 °
Mon
29 °
Tue
29 °
Wed
28 °

Most Popular

You cannot copy content of this page