कोल्हापूर :
सांगली येथे झालेल्या २०व्या कै. सौ. मीनाताई शिरगावकर स्मृती महिला खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत डॉ. डी. वाय. पाटील ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी महिमा मिलिंद शिर्केने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत द्वितीय क्रमांक पटकावला.
या उल्लेखनीय यशाबद्दल तिला रोख रुपये १२,५०० चे पारितोषिक प्रदान करण्यात आले. महिमाच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून तिचे कौतुक होत आहे. जिमखाना विभाग प्रमुख प्रा. सुदर्शन पोवार यांचे तिला मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, सल्लागार अशोकराव देसाई, प्राचार्य ए. बी. पाटील यांनी या यशाबद्दल महिमा शिर्केचे अभिनंदन केले.
डी. वाय. पाटील ज्युनिअर कॉलेजची महिमा शिर्के खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत द्वितीय
RELATED ARTICLES
Mumbai
moderate rain
29
°
C
29
°
28.9
°
74 %
3.6kmh
2 %
Wed
28
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
29
°
Sun
29
°

