Homeकला - क्रीडा'मोगरा फुलला' कार्यक्रम सोमवारी 

‘मोगरा फुलला’ कार्यक्रम सोमवारी 

कोल्हापूर :
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर विविध सांस्कृतिक उपक्रमांची मांदियाळी सुरू आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून कोल्हापूरच्या रसिकांसाठी ‘मोगरा फुलला’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार, २७ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता गोविंदराव टेंबे सभागृह, देवल क्लब, कोल्हापूर. येथे हा कार्यक्रम होणार असून त्यासाठी प्रवेश विनामूल्य आहे.
“ज्ञानीयांचा राजा मोगरा फुलला” हा कार्यक्रम संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अलौकिक जीवनचरित्रावर आधारित आहे. या कार्यक्रमात निरूपणकार गणेश शिंदे माऊलींच्या जीवनातील निवडक आणि प्रेरणादायी प्रसंग आपल्या ओघवत्या भाषेत उलगडून दाखवतील. या निरूपणाला सुप्रसिद्ध गायिका सन्मिता शिंदे यांच्या गायनाची साथ लाभणार असून, अभंग, भजन, गवळण आणि भारूड यांच्या माध्यमातून भक्तीचा मोगरा रसिकांच्या मनात दरवळणार आहे.
राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून हा उपक्रम राबविला जात आहे. संत ज्ञानेश्वरांचे विचार आणि त्यांचे कार्य केवळ ग्रंथांपुरते मर्यादित न राहता ते नव्या पिढीपर्यंत, विशेषतः तरुणांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावे, हा या आयोजनामागचा मुख्य उद्देश आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी कोल्हापूर परिसरातील सर्व रसिक श्रोत्यांना आणि भाविकांना या सांगीतिक मेजवानीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून, मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भक्तिरसाचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
Mumbai
moderate rain
28.5 ° C
28.5 °
28.5 °
82 %
10.4kmh
100 %
Thu
29 °
Fri
28 °
Sat
29 °
Sun
28 °
Mon
28 °

Most Popular

You cannot copy content of this page