• शिवाजी विद्यापीठ आंतरराष्ट्रीय परिषदेत द्वितीय क्रमांक
कोल्हापूर :
डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग विभागातील विद्यार्थ्यांच्या ‘सोनिक शील्ड’ नावीन्यपूर्ण स्टार्टअप कल्पनेला शिवाजी विद्यापीठात झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. या स्टार्टअपसाठी ५० हजार रुपयांचे सीड फंडिंग प्राप्त झाले आहे.
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे इंटरनॅशनल अकॅडेमिया–इंडस्ट्री–गव्हर्नमें
ही स्पर्धा विज्ञान, अभियांत्रिकी, आरोग्य व शेती क्षेत्रातील नवकल्पना, स्टार्टअप्स आणि ट्रेंड्स यांवर आधारित असून “विकसित भारत २०४७” या संकल्पनेशी निगडित होती. स्टार्टअप संकल्पनेतील नावीन्य, सर्जनशीलता आणि उद्योजकीय दृष्टिकोनामुळे त्यांची निवड करण्यात आली. या सीड फंडिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या स्टार्टअप कल्पनेला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोषकुमार चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे, विभागप्रमुख डॉ. सिद्धेश्वर पाटील आणि प्राध्यापक वर्ग यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
——————————
डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना स्टार्टअपसाठी ५० हजारचे सीड फंडिंग
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28.1
°
C
28.1
°
28.1
°
81 %
7.7kmh
100 %
Thu
28
°
Fri
28
°
Sat
29
°
Sun
29
°
Mon
28
°

