Homeशैक्षणिक - उद्योग पोदार इंटरनॅशनल स्कूलचा सीबीएसई दहावी परीक्षेत १००% निकाल

पोदार इंटरनॅशनल स्कूलचा सीबीएसई दहावी परीक्षेत १००% निकाल

• अथर्व जोशी ९९% गुणांसह प्रथम
कोल्हापूर :
पोदार इंटरनॅशनल स्कूल, कोल्हापूरने सीबीएसई इयत्ता १० वी बोर्ड परीक्षेत यंदाही दैदिप्यमान यश संपादन करत शैक्षणिक क्षेत्रातील आपली उत्कृष्ट परंपरा कायम राखली आहे. यावर्षी शाळेचा निकाल १००% लागला असून सर्व विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे, टॉपर विद्यार्थ्यांनी कोणत्याही कोचिंग क्लासचा आधार न घेता हे उल्लेखनीय यश मिळवले आहे.
या परीक्षेत अथर्व अशुतोष जोशी याने ९९% गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर संपदा सुनील खोराटे हिने ९८.६%, त्रिशा धीरज भुरे हिने ९८% गुण मिळवले. अभंग मनोजकुमार माने, ऋचा मधुसूदन अतिवाडकर आणि नौमान नियाझ अत्तार या तिघांनीही ९७.८% गुण मिळवत उत्कृष्ट कामगिरी नोंदवली.
विषयानुसार निकाल पाहता, अनेक विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवण्याची किमया साधली आहे. माहिती तंत्रज्ञान विषयात २३ विद्यार्थ्यांनी, इंग्रजीमध्ये ११, मराठीमध्ये ९, संस्कृतमध्ये ३, जर्मनमध्ये १, विज्ञानामध्ये १ आणि समाजशास्त्रामध्ये १ विद्यार्थ्याने १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत.
एकूण ३९% विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा अधिक गुण मिळवून शाळेचा निकाल अधिक उज्ज्वल केला आहे. या यशामागे विद्यार्थ्यांची कठोर मेहनत, शिक्षकांचे प्रभावी मार्गदर्शन आणि पालकांचा सातत्यपूर्ण पाठिंबा यांचा मोठा वाटा असल्याचे स्पष्ट होते. शाळेच्या प्राचार्या शिल्पा कपूर व उपप्राचार्या मनीषा आंब्राळे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28.1 ° C
28.1 °
28.1 °
81 %
8.1kmh
100 %
Wed
28 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
29 °
Sun
29 °

Most Popular

You cannot copy content of this page