Homeशैक्षणिक - उद्योग डी. वाय. अभियांत्रिकीचा संघ राष्ट्रीय हॅकॅथॉनमध्ये द्वितीय

डी. वाय. अभियांत्रिकीचा संघ राष्ट्रीय हॅकॅथॉनमध्ये द्वितीय

कोल्हापूर :
डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी आष्टा येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील हॅकॅथॉन स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. या विद्यार्थ्यांनी तयार केलेली ‘वेब बेस्ड हेल्थ मॉनिटरिंग सिस्टम’ लक्षवेधी ठरली.
अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालय येथे झालेल्या या स्पर्धेत देशभरातील ५० हून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालयांतील ८०० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी मेडिकेयर फील्ड मधील ‘वेब बेस्ड हेल्थ मॉनिटरिंग सिस्टम’ हा प्रोजेक्ट सादर केला. या संघाला द्वितीय क्रमांकाने सन्मानित करण्यात आले.
विजयी संघात संगणक अभियांत्रिकी विभागातील तृतीय वर्षात शिकणाऱ्या ऐश्वर्या देसाई, सारथी पाटील, आर्य सुतार, सुमित मुळे व स्वरूप पाल या पाच विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या संघाला २० हजार रुपयांचे रोख पारितोषिक मिळाले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे, संगणक अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. राधिका ढणाल यांनी संघातील विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28.1 ° C
28.1 °
28.1 °
81 %
8.1kmh
100 %
Wed
28 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
29 °
Sun
29 °

Most Popular

You cannot copy content of this page