कोल्हापूर :
मुंबई सायन्स टिचर्स असोसिएशनच्या वतीने राज्यस्तरावर घेण्यात आलेल्या डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेमध्ये संजय घोडावत ऑलिम्पियाड स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत तब्बल १० पदके जिंकली. ज्यात ३ सुवर्ण, ५ रौप्य आणि २ कांस्य पदकांचा समावेश आहे.
आर्यन प्रसन्न पवार, आध्या पुशान चिकली, आदित्य अभिजीत जाधव यांनी सुवर्णपदक पटकावले. रौप्य पदक प्राप्त करणाऱ्यांमध्ये ऐशना श्रीराम कुलकर्णी, अर्जुन विनायक बरगाले, समृद्धी रामदास बडे, चिरायू उमेश माने, शार्दुल सुश्रुत कुलकर्णी यांचा तर कांस्यपदक प्राप्त करणाऱ्यांमध्ये साची सुहास वाडकर, रुद्रराज सुरेश जाधव या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना या संस्थेचे झोनल हेड प्रभु श्रीनिवास यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजित अभ्यासक्रमामुळेच हे यश प्राप्त होऊ शकले. या विद्यार्थ्यांना संस्थेचे संचालक श्री. वासू याप्रसंगी म्हणाले कि, सातत्य व सराव हीच यशाची गुरुकिल्ली आहे. विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता वाढीसाठी संजय घोडावत ऑलिम्पियाड स्कूलने सातत्य राखले आहे.
चेअरमन संजय घोडावत व विश्वस्त विनायक भोसले यांनी सर्व मार्गदर्शक शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
——————————
घोडावत ऑलिम्पियाड स्कूलचे डॉ. होमी भाभा परीक्षेत यश
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28.1
°
C
28.1
°
28.1
°
81 %
7.7kmh
100 %
Thu
28
°
Fri
28
°
Sat
29
°
Sun
29
°
Mon
28
°

