• नवीन पदाधिकारी नेमणुकीसंदर्भात १३ एप्रिलपासून आढावा बैठका होणार
कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तसेच कोल्हापूर शहर आणि इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीमध्ये नवीन पदाधिकारी नेमणुकी संदर्भात काँग्रेस पक्षाच्यावतीने आढावा बैठका घेण्यात येणार आहेत. संघटन सृजन अभियाना अंतर्गत या बैठका दिनांक १३ ते १८ एप्रिल या कालावधीत ज्या त्या तालुक्यात घेण्यात येणार आहेत. या अभियानात काँग्रेसचे सर्व तालुकाध्यक्ष, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासह काँग्रेस पक्षासोबत जोडले जाण्याची इच्छा असणाऱ्या सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कोल्हापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांनी केले आहे.
अखिल भारतीय काँग्रेस समितीच्यावतीने संघटन सृजन अभियान राबवण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तसेच कोल्हापूर शहर आणि इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीमध्ये नवीन पदाधिकारी नेमणुकी संदर्भात काँग्रेस पक्षाच्यावतीने आढावा बैठका घेण्यात येणार आहेत. खासदार श्री शाहू छत्रपती महाराज आणि काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या बैठका १३ ते १८ एप्रिल या कालावधीत घेण्यात येणार आहेत.
या आढावा बैठकांना पक्षातर्फे मुख्य निरीक्षक जय शंकर पाठक यांच्या समवेत कोल्हापूर ग्रामीणसाठी सहनिरीक्षक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव नंदकुमार कुंभार, कोल्हापूर शहरसाठी राहुल गायकवाड, चंद्रपूरच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव सुनील मलके आणि राहुल वरदा उपस्थित राहणार आहेत.
या अभियानात काँग्रेसचे सर्व तालुकाध्यक्ष, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासह काँग्रेस पक्षासोबत जोडले जाण्याची इच्छा असणाऱ्या सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन कोल्हापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांनी केले आहे.
——————————
संघटन सृजन अभियाना अंतर्गत काँग्रेसच्यावतीने जिल्ह्यात आढावा बैठका
Mumbai
light rain
28
°
C
28
°
28
°
80 %
8kmh
100 %
Sat
29
°
Sun
29
°
Mon
29
°
Tue
28
°
Wed
29
°

