Homeशैक्षणिक - उद्योग डॉ. डी. वाय. पाटील बी. टेक. अ‍ॅग्रीच्या माजी विद्यार्थ्यांचे राज्यसेवा परीक्षेत यश

डॉ. डी. वाय. पाटील बी. टेक. अ‍ॅग्रीच्या माजी विद्यार्थ्यांचे राज्यसेवा परीक्षेत यश

• क्षितीज पाटील यांची डीएसपी तर संकेत कराळे यांची सहाय्यक गट विकास अधिकारीपदी निवड
कोल्हापूर :
डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, तळसंदे (बी. टेक. अ‍ॅग्री) येथील दोन माजी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) मार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा-२०२४ परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
महाविद्यालयातील २०१५ ते २०१९ च्या बॅचचे विद्यार्थी क्षितीज शंकर पाटील यांची पोलीस उपाधीक्षक (डीएसपी) गट-अ या प्रतिष्ठित पदावर निवड झाली आहे. राधानगरी तलुक्यातील मोहडे येथील ते रहिवासी आहेत. तसेच २०१३ ते २०१७ बॅचचे विद्यार्थी संकेत बलभीम कराळे यांची सहाय्यक गट विकास अधिकारी या पदावर निवड झाली आहे. ते अहिल्यानगर येथील बुरहाननगरचे रहिवासी आहेत. या दोन्ही विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश संपादन केले असून त्यांच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य व कॅम्पस डायरेक्टर प्रा. डॉ. एस. बी. पाटील यांनी दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य प्रा. डॉ. एस. बी. पाटील, उपप्राचार्य, इंजि. पी. डी. ऊके यांनी दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
30.8 ° C
30.8 °
30.8 °
68 %
6.1kmh
98 %
Sat
31 °
Sun
31 °
Mon
31 °
Tue
31 °
Wed
31 °

Most Popular

You cannot copy content of this page