Homeशैक्षणिक - उद्योग ₹१०० अब्ज डॉलर मूल्यांकनासह रिलायन्स रिटेलचा जागतिक यादीत ७वा क्रमांक

₹१०० अब्ज डॉलर मूल्यांकनासह रिलायन्स रिटेलचा जागतिक यादीत ७वा क्रमांक

कोल्हापूर :
रिलायन्स रिटेलने जगातील सर्वाधिक मूल्यवान खासगी स्टार्टअप कंपन्यांच्या जागतिक यादीत सातवे स्थान मिळवले आहे. स्टॅनफर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसच्या संशोधनानुसार, $१०० अब्जपेक्षा अधिक मूल्यांकनासह कंपनीने जागतिक स्तरावर महत्त्वपूर्ण कामगिरी नोंदवली आहे. पहिल्या १०० मूल्यवान स्टार्टअप कंपन्यांच्या यादीत तीन भारतीय कंपन्यांचा समावेश आहे, असे प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
अहवालानुसार, रिलायन्स रिटेलचे पोस्ट-मनी मूल्यांकन $१०० अब्जपेक्षा अधिक असून त्यामुळे ती ‘हेक्टाकॉर्न’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जगातील अव्वल सात कंपन्यांमध्ये समाविष्ट झाली आहे. $१०० अब्जपेक्षा अधिक मूल्यांकन असलेल्या स्टार्टअप कंपन्यांना ‘हेक्टाकॉर्न’ असे म्हटले जाते. अव्वल सात कंपन्यांमध्ये रिटेल क्षेत्रातील रिलायन्स रिटेल ही एकमेव कंपनी आहे.
कंपनीला कतार इन्व्हेस्टमेंट ऑथॉरिटी, अबू धाबी इन्व्हेस्टमेंट ऑथॉरिटी, केकेआर, सिल्वरलेक, जीआयसी, टीपीजी आणि मुबाडाला यांसारख्या आघाडीच्या जागतिक गुंतवणूकदारांकडून भांडवली गुंतवणूक मिळाली आहे. गुंतवणूकदारांनी निश्चित केलेल्या कंपनीच्या मूल्यमापनावरच या क्रमवारीचा मुख्य आधार आहे. ही क्रमवारी स्टॅनफर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसच्या व्हेंचर कॅपिटल इनिशिएटिव्हच्या संशोधनावर आधारित असून जानेवारी २०२६ पर्यंतच्या आकडेवारीचा यात समावेश आहे. या यादीत पहिल्या तीन स्थानांवर आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातील ओपनएआय, इलॉन मस्क यांची स्पेसएक्स आणि अँथ्रोपिक या कंपन्या आहेत. यावरून जागतिक गुंतवणूक प्रवाहात तंत्रज्ञान आणि एआय कंपन्यांचे वाढते वर्चस्व स्पष्ट होते.
अहवालात भारतातील एकूण तीन कंपन्यांचा समावेश आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE India) $२४ अब्ज मूल्यांकनासह २७व्या स्थानावर आहे, तर टाटा ईव्ही मोबिलिटी $९ अब्ज मूल्यांकनासह ९३व्या स्थानावर आहे.
अमेरिका ६५ कंपन्यांसह या यादीत आघाडीवर आहे, तर चीनच्या २१ कंपन्यांचा समावेश आहे. भारत आणि ब्रिटनमधील प्रत्येकी तीन कंपन्यांनी या यादीत स्थान मिळवले आहे.
——————————————————-
RELATED ARTICLES
Mumbai
moderate rain
27.9 ° C
27.9 °
27.9 °
84 %
7.8kmh
79 %
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
28 °

Most Popular

You cannot copy content of this page