कोल्हापूर :
डॉ. राजेंद्र भारुड यांनी मंगळवारी कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. त्यांनी माजी आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांच्याकडून सायंकाळी ४ वाजता कार्यभार स्वीकारला. कोल्हापूरात दुपारी आगमन झाल्यानंतर डॉ. राजेंद्र भारुड यांनी प्रथम अंबाबाई मंदिर येथे जाऊन देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर महापालिकेत येऊन त्यांनी अधिकृतपणे आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला.
पदभार स्विकारल्यानंतर आयुक्त राजेंद्र भारुड यांनी महापौर रुपाराणी निकम यांची भेट घेऊन महापालिकेच्या विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी परिवहन समिती सभापती सत्यजित जाधव उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी आयुक्त कार्यालयातील मीटिंग हॉलमध्ये सर्व विभाग प्रमुखांसोबत बैठक घेऊन विविध विभागांच्या कामकाजाची माहिती घेतली.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ व शिल्पा दरेकर, उपआयुक्त परितोष कंकाळ व किरणकुमार धनवाडे, सहायक आयुक्त उज्वला शिंदे व स्वाती दुधाणे, सहा. संचालक (नगररचना) प्रशांत भोसले, शहर अभियंता हर्षजीत घाटगे, जल अभियंता हर्षजीत घाटगे, मुख्य लेखापरीक्षक कलावती मिसाळ, लेखापाल संजय सरनाईक, प्रशासन अधिकारी डी. सी. कुंभार, उप-शहर रचनाकार एन. एस. पाटील यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
——————————
नुतन आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी पदभार स्वीकारला
Mumbai
clear sky
28.7
°
C
28.7
°
28.7
°
72 %
2.2kmh
2 %
Sat
29
°
Sun
31
°
Mon
30
°
Tue
29
°
Wed
30
°

