कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्यावतीने संघाच्या ताराबाई पार्क येथील विकासकक्ष कार्यालयात गोकुळचे शिल्पकार माजी चेअरमन स्व. आनंदराव ज्ञानदेव पाटील- चुयेकर यांची ८८वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील व संचालक यांच्या हस्ते स्व. आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी उपस्थितीत होते.
याप्रसंगी गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले की, गोकुळ दूध संघाच्या उभारणी व वाटचालीत स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांचे मोलाचे योगदान आहे. १९६३ साली अवघ्या ७०० लिटर दूध संकलनापासून सुरू झालेल्या गोकुळ दूध संघाने आज २० लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा गाठला आहे. या सर्व प्रगतीमध्ये चुयेकर साहेबांचे योगदान कदापि विसरता येणार नाही.
दूध उत्पादक शेतकऱ्यांप्रती असलेली त्यांची तळमळ व त्यांनी घेतलेले धाडसी निर्णय यामुळेच गोकुळ आज यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गावोगावी धवल क्रांती निर्माण करून गोकुळच्या माध्यमातून ग्रामीण जीवन समृद्ध करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या आचार-विचारांवरच गोकुळची भविष्यातील वाटचाल सुरू राहिल, असेही नविद मुश्रीफ यांनी सांगितले.
यावेळी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. एम. पी. पाटील यांनी केले. याप्रसंगी संचालक युवराज पाटील, संभाजी पाटील, बाळासो खाडे, संचालिका अंजना रेडेकर, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ. प्रकाश साळुंके, संकलन व्यवस्थापक दत्तात्रय वागरे, डॉ. प्रकाश दळवी, धनाजी पाटील, के. डी. आमते, बाजीराव मुडूकशिवाले, अशोक पुणेकर, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील तसेच संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
गोकुळ’चे शिल्पकार माजी चेअरमन स्व. आनंदराव पाटील-चुयेकर यांची जयंती साजरी
RELATED ARTICLES
Mumbai
moderate rain
29
°
C
29
°
28.9
°
74 %
3.6kmh
2 %
Wed
28
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
29
°
Sun
29
°

