Homeराजकियसतेज पाटील यांचा वाढदिवस होणार लोकोत्सव

सतेज पाटील यांचा वाढदिवस होणार लोकोत्सव

• कार्यकर्त्यांचा संकल्प : दहा लाख वह्या संकलनाचे उदिष्ट
कोल्हापूर :
काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांचा १२ एप्रिलला होणारा वाढदिवस विविध उपक्रम राबवून लोकोत्सव म्हणून साजरा करण्याचा संकल्प सोमवारी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आला. या वाढदिवसानिमित्त दहा लाख वह्या संकलनाचे उदिष्ट ठेवले आहे.
आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसाच्या नियोजनासाठी जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी विविध उपक्रम राबवत सतेज पाटील यांच्या वाढदिवस लोकोत्सव म्हणून साजरा करण्याचा मानस काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. “देऊया गरजूंना साथ सतेज पाटील यांच्या वाढदिनी मदतीचा हात” हे ब्रीद घेत जिल्ह्यातील अनेक संस्था, संघटना आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार असल्याचे सांगितले.
यामध्ये रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, वृद्धाश्रम फळे वाटप, विद्यार्थ्यांच्या गुणवता वाढीसाठी विविध स्पर्धा, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, अपंग, निराधार मुलांना अल्पोपहार, गुणवंत कामगार संघटनेमार्फत काव्य संमेलनाचे आयोजन, जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये वृक्षारोपण, फुटबॉल, करवीर सतेज चषक स्पर्धा, लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा तसेच तालुका स्तरावरही विविध सामाजिक उपक्रम राबण्यात येणार आहेत.
आमदार सतेज पाटील यांनी वाढदिवसानिमित्त हारतुरे, पुष्पगुच्छ न स्वीकारता गरजू विद्यार्थ्यांसाठी वह्या भेट देण्याचा उपक्रम २००७ पासून सुरु आहे. या सामाजिक उपक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकाॅर्डमध्ये झाली आहे. यंदाही  कोल्हापूर महानगरपालिकेच्या ३८ नगरसेवकांच्या माध्यमातून आमदार पाटील यांच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त ५४ हजार वह्या देण्याचा संकल्प महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजू लाटकर यांनी केला.
जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते एकनाथ पाटील यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या १५ सदस्यांंच्या माध्यमातून ५४ हजार वह्या भेट देण्याचा संकल्प जाहीर केला. युवराज गवळी यांनी गवळी समाजाच्या माध्यमातून ११ हजार वह्या भेट देत पाचगावमध्ये म्हैस शर्यत स्पर्धा आयोजित करणार असल्याचे सांगितले, तसेच जिल्ह्यातील सर्वच काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आपल्या ग्रामदैवताला अभिषेक घालून आमदार पाटील यांना दिर्घायुष्य लाभावे यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले. यंदा दहा लाख वह्यांचे उदिष्ठ ठेवल्याचे  काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी सांगितले. युथ काँग्रेसच्या माध्यमातून २५ हजार वह्या देण्याचे त्यांनी जाहीर केले.
या बैठकीला आमदार जयंत आसगावकर, शहराध्यक्ष सचिन चव्हाण, जिल्हा परिषद काँग्रेसचे गटनेते एकनाथ पाटील, महापालिका विरोधी पक्षनेते राजू लाटकर, काँग्रेसचे गटनेते इंद्रजीत बोंद्रे, गोकुळचे संचालक चेतन नरके, संचालक बाबासाहेब चौगले, बयाजी शेळके, जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तायशेटे, शशिकांत खोत, माजी नगरसेवक भूपाल‌ शेटे, भारती पोवार, तौफिक मुल्लानी, युवराज गवळी, बाळासाहेब सरनाईक, अक्षय शेळके, भरत रसाळे, संपतराव पाटील, संजय पोवार – वाईकर, मंगल खुडे, सरलाताई पाटील, उज्ज्वला चौगले, हेमा पाटील, नगरसेवक संजय मोहिते, दुर्वास कदम, प्रवीण केसरकर, अर्जुन माने, अमर समर्थ, सुभाष बुचडे, विनायक कारंडे, अजित पोवार, सचिन चौगले, संतोष जरग, दिपाली घाटगे यांच्यासह आजी व माजी नगरसेवक उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
moderate rain
27.9 ° C
27.9 °
27.9 °
83 %
7.4kmh
99 %
Mon
28 °
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °
Fri
28 °

Most Popular

You cannot copy content of this page