Homeसामाजिकशिवाजी विद्यापीठात शुक्रवारपासून फुले-शाहू-आंबेडकर सप्ताह

शिवाजी विद्यापीठात शुक्रवारपासून फुले-शाहू-आंबेडकर सप्ताह

• विशेष व्याख्यानांसह ‘सलाम संविधान’ कार्यक्रमाचे आयोजन
कोल्हापूर :
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्या वतीने १० ते १४ एप्रिल या कालावधीत फुले-शाहू-आंबेडकर सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवारी (दि. १०) सकाळी १०:३० वाजता विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत सप्ताहाचे उदघाटन होईल. यावेळी प्रा. सुकुमार कांबळे यांचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे धम्मचिंतन’ या विषयावर व्याख्यान होईल. महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (दि. ११) सकाळी १०:३० वाजता बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्त्रोत केंद्राच्या सभागृहात प्राचार्य जी. पी. माळी यांचे ‘महात्मा जोतीराव फुले यांचा मानवतावादी सत्यधर्म’ या विषयावर व्याख्यान होईल.
रविवारी (दि. १२) सकाळी १०:३० वाजता शिवाजी विद्यापीठाच्या शिववार्ता (@ShivVarta) या युट्यूब वाहिनीवर प्रा. रमेश जाधव यांचे ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे समतामूलक समाज निर्मितीचे कार्य’ या विषयावर व्याख्यान होईल. सोमवारी (दि. १३) सकाळी १०:३० वाजता राजर्षि शाहू सभागृहात डॉ. प्रकाश कांबळे लिखित ‘वर्तमान उपयुक्त अर्थतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या ग्रंथावर परिसंवाद आयोजित करण्यात आला असून या परिसंवादात डॉ. प्रवीण जाधव व डॉ. गिरीश मोरे सहभागी होतील. त्याच दिवशी सायंकाळी ५:३० वाजता राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहामध्ये विद्यार्थी विकास विभाग व शिवाजी विद्यापीठ वसतिगृहातील विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिद्ध गायक कबीर नाईकनवरे यांचा ‘सलाम संविधान’ हा कार्यक्रम होईल.
मंगळवारी (दि. १४) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा मुख्य कार्यक्रम होणार असून सकाळी ८ वाजता विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक व पूजन आणि त्यानंतर सकाळी १० वाजता डॉ. प्रशांत बनसोडे यांचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आंतरराष्ट्रीय परिप्रेक्ष्य’ या विषयावर व्याख्यान होईल.
या सर्व कार्यक्रमांचा नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी केले आहे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28 ° C
28 °
28 °
83 %
2.1kmh
6 %
Wed
28 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
29 °
Sun
29 °

Most Popular

You cannot copy content of this page