कोल्हापूर :
ऋषिकेश मेथे-पाटीलचे तीन गोल तर प्रथमेश हेरेकरचे दोन गोल आणि ओमकार मोरेने नोंदवलेला एक गोल अशा अर्धा डझन गोलने पाटाकडील तालीम मंडळने रंकाळा तालीम मंडळचा धुव्वा उडविला. तसेच थांगजालेन हाओकिपने नोंदवलेले दोन गोल आणि संकेत वेसणेकरच्या एका गोलच्या जोरावर दिलबहार तालीम मंडळने संध्यामठ तरुण मंडळवर ३-० असा एकतर्फी विजय मिळवला. पाटाकडीलचा ऋषिकेश मेथे-पाटील तर दिलबहारचा थांगजालेन हाओकिप सामनावीर ठरले.
पाटाकडील तालीम मंडळ व डॉ. डी. वाय. पाटील ग्रुप, कोल्हापूर यांचे संयुक्त विद्यमाने आणि कै. पांडबा जाधव व कै. रावसाहेब सरनाईक यांचे स्मरणार्थ ‘सतेज चषक २०२६’ फुटबॉल स्पर्धा सुरू आहे. छत्रपती शाहू स्टेडियमवर दुपारी पाटाकडील आणि रंकाळा तालीम यांच्यातील सामना पूर्णपणे एकतर्फी झाला. सुरुवातीपासून सामन्यावर पाटाकडीलचे वर्चस्व राहिले. नबी खानने दिलेल्या पासवर प्रथमेश हेरेकरने गोल करून १६व्या मिनिटाला संघाला आघाडीवर नेले. त्यानंतर सेंटरच्या पुढे प्रथमेश हेरेकरने दिलेल्या पासवर ऋषिकेश मेथे-पाटीलने खोलवर चढाई करत सहजपणे गोल नोंदविला. ३३व्या मिनिटाला २-० अशी आघाडी झाली. दरम्यान, प्रतिक बदामेने टाकलेल्या लॉपवर गोलक्षेत्रात ऋषिकेश मेथे-पाटीलने हेडव्दरा चेंडू अरबाज पेंढारीकडे पास केला, त्यावर अरबाजने हेडव्दारा मारलेला चेंडू गोलरक्षक शरद मेढेने पकडून गोलचा प्रयत्न फोल ठरविला. डी टॉपवरून ऋषिकेश मेथे-पाटीलने मारलेल्या फटक्यावर चेंडू गोलपोस्टला धडकल्याने गोलची संधी हुकली. ऋषिकेश मेथे-पाटील, अमीन खझीर, प्रथमेश हेरेकर, ओमकार मोरे यांच्या अनेक सोप्या संधी वाया गेल्या. अन्यथा पूर्वार्धात गोलची मोठी आघाडी मिळाली असती. रंकाळा तालीमकडून अमित जाधव, साई कदम, सोहम निकम, स्वप्नील तेलवेकर यांनी केलेल्या चढायांना यश मिळाले नाही.
उत्तरार्धात प्रथमेश हेरेकरने मारलेल्या फटक्यावर चेंडू गोलपोस्टला धडकला. बदली खेळाडू रोहित पवारने दिलेल्या पासवर ऋषिकेश मेथे-पाटीलने वैयक्तिक दुसरा तर संघाचा तिसरा गोल ५७व्या मिनिटाला फलकावर झळकवला. चढाईतील सातत्य कायम राखत ६५व्या मिनिटाला ओमकार मोरेने गोल नोंदवून संघाची आघाडी ४-० अशी भक्कम केली. त्यानंतर रोहित पवारच्या पासवर डी टॉपवरून प्रथमेश हेरेकरने जोरदार फटक्यावर चेंडूला थेट गोलजाळ्याची दिशा दाखवली. ७८व्या मिनिटाला प्रथमेशने वैयक्तिक दुसरा तर संघाचा पाचवा गोल नोंदविला. लगेचच ऋषिकेश मेथे-पाटीलने आपल्या अनुभवाचा फायदा उठवत गोल केला. गोलक्षेत्रात मिळालेल्या चेंडूला गोलरक्षकाच्या डोक्यावरून थेट गोलजाळ्यात धाडला आणि वैयक्तिक तिसरा तर संघाचा सहावा गोल ७९व्या मिनिटाला नोंदविला. सामन्यात ऋषिकेश, ओमकार, प्रथमेश, अमीन खझीर यांच्या अनेक सोप्या संधी वाया गेल्या. रंकाळा तालीमकडून सूरज बाटे, सोहम निकम, अमित जाधव, साई कदम यांना कमकुवत व दिशाहीन फटके तसेच समन्वयाअभावी गोल करण्यात यश आले नाही. गोलरक्षक शरद मेढेने पाटाकडीलच्या अनेक चढाया व्यर्थ ठरविल्या.
दिलबहारचा एकतर्फी विजय….
दुपारच्या सत्रातील पहिल्या सामन्यात दिलबहारने संध्यामठवर ३-० असा एकतर्फी विजय मिळवला. पहिल्या अर्ध्या तासात दोन्ही संघाकडून परस्परांचे गोलक्षेत्र भेदणाऱ्या चढाया झाल्या पण गोलची नोंद झाली नाही. ३०व्या मिनिटाला थांगजालेन हाओकिपने दिलबहारला १-० ची आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात संकेत वेसणेकरने ४२ व्या मिनिटाला गोल नोंदवून आघाडी २-० वर नेली. अखेर जादावेळेत थांगजालेन हाओकिपने वैयक्तिक दुसरा तर संघाचा तिसरा गोल नोंदवून विजयावर शिक्कामोर्तब केले. संध्यामठकडून कपील शिंदे, अभिजीत साळोखे, आदित्य रोटे, पृथ्वीराज साळोखे, चिन्मय पाटील यांनी गोलसाठी अटोकाट प्रयत्न केले पण त्यांना यश मिळाले नाही.
——————————
• खंडोबा – वर्षाविश्वास : दुपारी १:३० वा.
• बालगोपाल – सम्राटनगर : दुपारी ४ वाजता
——————————
पाटाकडील आणि दिलबहारचे एकतर्फी विजय
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
30
°
C
30
°
29.9
°
51 %
5.7kmh
40 %
Mon
30
°
Tue
28
°
Wed
29
°
Thu
29
°
Fri
29
°

