कोल्हापूर :
कागल येथील जैवविविधता उद्यानात शिवाजी विद्यापीठातील हिंदी अधिविभागातर्फे पक्ष्यांसाठी दोन कृत्रिम पाणवठे (पक्षीतीर्थ) तयार केले आहेत.
किर्लोस्कर ऑईल इंजिन्स कंपनीच्या सामजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत येथील सार्थ एज्युकेशन सोसायटीतर्फे कागल येथे जैव विविधता उद्यान पुनरुज्जीवन प्रकल्पाचे काम चालू आहे. या ठिकाणी शिवाजी विद्यापीठातील हिंदी अधिविभागाच्या वतीने नुकतेच पक्ष्यांसाठी कृत्रिम पाणवठे (पक्षीतीर्थ) तयार करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला.
तीव्र उन्हाळ्यामुळे पशुपक्ष्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. पक्ष्यांसह छोट्या प्राण्यांसाठी पाण्याची सोय करण्याच्या दृष्टीने सार्थ एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. दिलीप माळी यांनी असा उपक्रम हाती घेण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले होते. त्यानुसार हिंदी अधिविभागातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी उद्यानात श्रमदानातून दोन कृत्रिम पाणवठे (पक्षीतीर्थ) तयार केले. वृक्षप्रेमी संस्थेचे अमोल बुद्धे, यांच्या मार्गदर्शनाखाली पाणवठे तयार करण्यात आले. हिंदी अधिविभागातील डॉ. जयसिंग कांबळे, डॉ. प्रकाश निकम, डॉ. अक्षय भोसले तसेच संशोधक, विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी श्रमदानात सहभाग घेतला.
अमोल बुद्धे यांनी उपस्थितांना पक्ष्यांसाठी तयार घरटी वाटप केली व त्यांचे महत्व समजून सांगितले. यावेळी डॉ. दिलीप माळी यांनी जैव विविधता उद्यानाच्या पुनरुज्जीवनाचा उद्देश, प्रकल्पाचे भविष्यातील नियोजन, सामाजिक महत्व तसेच जैव विविधतेची गरज याबद्दल माहिती दिली. हिंदी अधिविभागाच्या प्रमुख डॉ. तृप्ती करेकट्टी यांनी प्रास्ताविक करून आभार मानले.
——————————
कागलच्या जैव विविधता उद्यानात शिवाजी विद्यापीठातर्फे पक्ष्यांसाठी कृत्रिम पाणवठे
Mumbai
moderate rain
29
°
C
29
°
28.9
°
74 %
3.6kmh
2 %
Wed
28
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
29
°
Sun
29
°

