कोल्हापूर :
जयपूर अतरौली घराण्याच्या गायकीची धुरा नेटाने पुढे नेणाऱ्या जयपूर अतरौली घराण्याच्या प्रथितयश कलाकार विदुषी श्रुती सडोलीकर काटकर यांना यंदाचा सरदार आबासाहेब मुजुमदार पुरस्कार जाहीर झाला आहे. सन्मानचिन्ह, महावस्त्र, श्रीफळ व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
शनिवारी (दि.११) देवल क्लबच्या बाळासाहेब घाटगे कलादालनात सायंकाळी पाच वाजता पुरस्कार प्रदान सोहळा होईल. रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या निवृत्त डेप्युटी गव्हर्नर सौ. उषादेवी थोरात यांच्या हस्ते पुरस्कार दिला जाईल. यापूर्वी पंडित विनोद डिग्रजकर, पंडित सुधीर पोटे, पंडित अरुण कुलकर्णी व श्रीमती वासंती टेंबे यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
जुन्या पिढीतील दुर्मिळ वाद्य, संगीत आणि इतिहासाबरोबरच हस्तलिखितांचे संग्राहक म्हणून श्रीमंत सरदार रसिकराज आबासाहेब मुजुमदार यांची ओळख आहे. पुण्याच्या भारत इतिहास संशोधन मंडळात अनेक वर्षे कार्यरत होते. त्यांच्या स्मृती चिरंतन जपल्या जाव्यात या उद्देशाने गायन समाज देवल क्लब व मुजुमदार कुटुंबीयांतर्फे हा पुरस्कार दिला जातो. पुरस्कार वितरणानंतर विदुषी श्रुती सडोलीकर काटकर यांच्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम होणार आहे.
या सोहळ्याच्याअध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील हे आहेत. विदुषी श्रुती सडोलीकर काटकर यांना तबला व संवादिनीची साथ अनुक्रमे राज प्रसाद धर्माधिकारी व चिन्मय कोल्हटकर करणार असून संगीतप्रेमी रसिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीमती अनुपमा मजुमदार व देवल क्लबचे श्रीकांत डिग्रजकर यांनी केले आहे.
——————————
विदुषी श्रुती सडोलीकर काटकर यांना रसिकराज पुरस्कार जाहीर
RELATED ARTICLES
Mumbai
moderate rain
29
°
C
29
°
28.9
°
74 %
3.6kmh
2 %
Wed
28
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
29
°
Sun
29
°

