कोल्हापूर :
अत्यंत चुरशीने खेळल्या गेलेल्या सामन्यात खंडोबा तालीम मंडळने दिलबहार तालीम मंडळचा ३ विरूध्द २ गोलने पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली आहे. गतविजेत्या खंडोबाने पिछाडीवरुन आघाडी घेत दिलबहारचे आव्हान संपुष्टात आणले व अंतिम फेरीत गाठली. खंडोबाच्या विष्णू टी.एम. याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
बालगोपाल तालीम मंडळ आयोजित व जाधव इंडस्ट्रीज पुरस्कृत चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे. गुरुवारी गतविजेता खंडोबा तालीम मंडळ आणि दिलबहार तालीम मंडळ यांच्यातील सामना अटीतटीचा झाला. पूर्वार्धात दिलबहारकडून झालेल्या चढाईत थांगजालेन हाओकिप याला अवैधरित्या रोखल्याने फ्रिकिक मिळाली. या फ्रिकिकवर थांगजालेन हाओकिपने मारलेल्या फटक्यावर चेंडू गोलरक्षक आकाश मेस्त्रीने रोखण्याचा केलेला प्रयत्न अयशस्वी ठरला. अशाप्रकारे ६व्या मिनिटालाच गोल नोंदवून दिलबहारने १-० ची आघाडी घेत खळबळ उडवून दिली. यानतर पिछाडीवर असलेल्या खंडोबाकडून शॉर्ट पासिंव्दारे खोलवर चढाया झाल्या. त्यांच्या रोहित जाधव, प्रभू पोवार, विष्णू टी.एम., पृथ्वीराज साळोखे यांनी एका पाठोपाठ एक अशा गोलक्षेत्रात चढाया केल्या. एका चढाईत गोलक्षेत्रात विष्णू टी.एम.ला बचावपटू सुशांत अतिग्रेने धोकादायकरित्या रोखल्याने मुख्यपंच सुमित जाधव यांनी खंडोबाला पेनल्टी किक दिली. यावर प्रभू पोवारने अचूक गोल नोंदवून संघाला १-१ अशी बरोबरी साधून दिली. ३३व्या मिनिटाला सामना बरोबरीत आल्यावर पुढच्याच चढाईत ऋतुराज संकपाळच्या पासवर रोहित जाधवने गोल नोंदवून संघाला २-१ने आघाडीवर नेले. त्यानंतर जादावेळेत रोहित जाधवने दिलेल्या पासवर प्रभू पोवारने वैयक्तिक दुसरा तर संघाचा तिसरा गोल नोंदविला. अशाप्रकारे पूर्वार्धातच खंडोबाने एक गोलच्या पिछाडीवरून ३-१ अशी आघाडी घेत दबदबा निर्माण केला.
उत्तरार्धात गोलची परतफेड करण्यासाठी दिलबहारच्या थांगजालेन हाओकिप, फेबिन गिब्स, स्वयंम साळोखे, गंधर्व घाटगे, ओम जरग यांनी आक्रमक चाली रचल्या. फेबिन गिब्सने डी टॉपवरून मारलेला चेंडू गोलपोस्टवरून गेला. माणिक पाटीलचा बायसिकल किकव्दारे गोल नोंदवण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. एका चढाईत थांगजालेन हाओकिपकडून मिळालेल्या पासवर लामखोलन दौंगेलने जोरदार फटक्यावर चेंडूला थेट गोलजाळ्याची दिशा दाखवली. ६८व्या मिनिटाला सामना ३-२ असा आल्यावर बरोबरी साधण्याचा दिलबहारकडून खूप प्रयत्न झाला. त्यांच्या थांगजालेनचा फटका गोलरक्षक आकाश मेस्त्रीने रोखला. खंडोबाकडून विष्णू टी.एम., कुणाल दळवी, संकेत मेढे, रोहित जाधव, पृथ्वीराज साळोखे, प्रथमेश गावडे यांनी गोलची आघाडी वाढवण्यासाठी केलेल्या चढायांना यश मिळाले नाही. विष्णूने गोलक्षेत्रातून एक सोपा संधी दवडली. अखेर उर्वरित वेळेत ३-२ ची आघाडी कायम राखत खंडोबाने विजयावर शिक्कामोर्तब केले.
——————————
• पाटाकडील – बालगोपाल: दुपारी ४ वाजता
——————————
खंडोबाची अंतिम फेरीत धडक
RELATED ARTICLES
Mumbai
moderate rain
29
°
C
29
°
28.9
°
74 %
3.6kmh
2 %
Wed
28
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
29
°
Sun
29
°

