• अत्याधुनिक ३एस डीलरशिप केंद्राचे उदघाटन
कोल्हापूर :
महिंद्राच्या ट्रक आणि बस विभागाने गेल्या चार वर्षांत उत्पादन विक्रीत नवनव्या विक्रमांची उंची गाठली आहे. हा टप्पा गाठल्यानंतर आता कंपनीने कोल्हापूर येथे अत्याधुनिक ३एस (सेल्स, सर्व्हिस आणि स्पेअर पार्ट्स) डीलरशिपचे केंद्र सुरु केले आहे. नुकतेच या केंद्राचे उदघाटन करण्यात आले.
हे नवीन केंद्र सर्व आधुनिक सोयीसुविधांनी सज्ज असून, यामध्ये ६ सर्व्हिस बे उपलब्ध आहेत. या सोयीमुळे दररोज ६ पेक्षाही जास्त वाहनांची देखभाल दुरुस्ती करणे शक्य होणार आहे. ग्राहकांच्या आणि चालकांच्या सोयीसाठी विश्रांतीगृह, २४ तास आपत्कालीन ब्रेकडाऊन सेवा आणि अडब्लूची अखंड उपलब्धता यांसारख्या विशेष सुविधा पुरवण्यात आल्या आहेत.
या केंद्राच्या उदघाटनप्रसंगी महिंद्रा समूहाच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य आणि ट्रक्स, बसेस आणि कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट विभागाचे अध्यक्ष विनोद सहाय म्हणाले की, कोल्हापूरमध्ये मेसर्स माउली ट्रकिंग प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने आमच्या या नवीन आणि अत्याधुनिक डीलरशिपचे उद्घाटन करताना मला अत्यंत आनंद होत आहे. महिंद्रा ट्रक्स एण्ड बसेस आणि एसएमएल यांची एकत्रित ताकद आता देशभरात २०० पेक्षा जास्त ३एस डीलनशिप्स आणि ४०० हून अधिक दुय्यम सेवा केंद्रांपर्यंत पोहोचली आहे. यानिमित्ताने आम्ही आमच्या ग्राहकांना जागतिक दर्जाची सेवा देत आहोत. सध्या ट्रक्स आणि बसेसच्या बाजारपेठेत आमचा हिस्सा जवळपास ७टक्के आहे. इंटरमीडिएट आणि लाईट कमर्शिअल बसेसमध्ये आमचा वाटा २४ टक्क्यापर्यंत आहे. आगामी काळात व्यवसायाचा विस्तार करत आर्थिक वर्ष २०३१ पर्यंत बाजारातील हिस्सा १० ते १२ टक्क्यांपर्यंत तर आर्थिक वर्ष २०३६ पर्यंत तो २० टक्क्यांहून जास्त उंचीवर नेण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.
महिंद्रा ट्रक्स, बसेस आणि कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट विभागाचे बिझनेस हेड डॉ. व्यंकट श्रीनिवास म्हणाले की, आम्ही ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून काम करतो. या ध्यासापोटी आम्ही ग्राहकांसाठी नावीन्यपूर्ण आणि फायदेशीर पर्याय उपलब्ध करुन देत आहोत. आमच्या उत्पादन श्रेणींमध्ये जास्त मायलेज देणाऱ्या वाहनांपासून ते अत्याधुनिक टेलिमॅटिक्स सोल्यूशन सेवा उपलब्ध आहेत. आम्ही ग्राहकांना त्यांच्या संपूर्ण वाहतूक व्यवसायावर नियंत्रण मिळवून दिले आहे. डिलरशिपचे वाढते जाळे आणि विक्रीपश्चात सेवांच्या माध्यमातून आम्ही वाहन उद्योगातील ग्राहकांना चांगला अनुभव देण्यास सदैव तत्पर राहू.
महिंद्राच्या ब्लाझो एक्स, फ्युरीओ, ऑप्टिमो आणि जायो या ट्रकच्या वर्गवारीतील वाहने डबल सर्व्हिस गॅरंटीसह उपलब्ध आहेत. या वैशिष्ट्यांसह उपलब्ध असलेली ही वाहने भारतातील पहिल्यांदाच उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे ही वाहने या वैशिष्ट्यांसह उपलब्ध असलेली भारतातील एकमेव वाहने ठरतात, असा दावा कंपनीच्यावतीने करण्यात आला आहे.
——————————
महिंद्रा ट्रक्स एण्ड बसेसचा कोल्हापूरात विस्तार
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28
°
C
28
°
26.9
°
83 %
7.2kmh
7 %
Fri
30
°
Sat
29
°
Sun
29
°
Mon
29
°
Tue
28
°

