कोल्हापूर :
चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत शनिवारी झालेल्या सामन्यात पाटाकडील तालीम मंडळने रंकाळा तालीम मंडळवर ५-० गोलने तर प्रॅक्टीस फुटबॉल क्लबने वर्षाविश्वास फुटबॉल क्लबवर ५-० गोलने दणदणीत विजय मिळवला. या विजयासह दोन्ही संघांनी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. प्रथमेश हेरेकर आणि सचिन गायकवाड यांना सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
बालगोपाल तालीम मंडळ आयोजित व जाधव इंडस्ट्रीज पुरस्कृत ‘चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे. शनिवारी झालेले दोन्ही सामने पूर्णपणे एकतर्फी झाले. पाटाकडील आणि रंकाळा तालीम सामन्यात पूर्वार्धात चार गोल नोंदवले गेले तर उत्तरार्धात एका गोलची नोंद झाली. सामन्याच्या ८व्या मिनिटाला प्रथमेश हेरेकरने मैदानी गोल नोंदवून संघाचे खाते उघडले. त्यानंतर १४व्या मिनिटाला ऋषिकेश मेथे-पाटीलने दिलेल्या पासवर प्रथमेश हेरेकरने वैयक्तिक तसेच संघाचाही दुसरा गोल फलकावर झळकवला. एका चढाईत ऋषिकेश मेथे-पाटीलने मारलेल्या चेंडू रोखण्याचा प्रयत्न करताना रंकाळा तालीमचा खेळाडू प्रतिक पाटील याच्याकडून स्वयंगोल झाला. अशाप्रकारे २६व्या मिनिटास तिसऱ्या गोलची नोंद झाली. ३७व्या मिनिटाला प्रथमेश हेरेकरने सेंटरपासून दिलेल्या पासवर ऋषिकेश मेथे – पाटीलने खोलवर चढाई करत सहजपणे मैदानी गोल नोंदविला.
पूर्वार्धात मिळालेल्या ४-० गोलच्या भक्कम आघाडीवर पाटाकडीलने गोलसाठी खोलवर चढाया केल्या. प्रथमेश हेरेकर, ओमकार मोरे, ऋषिकेश मेथे-पाटील, अमीन खझीर यांना सोप्या संधी मिळूनही गोल करण्यात अपयशी ठरले. एका चढाईत रोहित मंडलिकला मिळालेल्या पासवर त्याने आपल्या अनुभवाच्या जोरावर चेंडूला थेट गोलजाळ्याची दिशा दाखवली. अशाप्रकारे ७६व्या मिनिटाला ५-० अशी भक्कम आघाडी झाली. रंकाळा तालीमकडून सोहम निकम, विवेक पाटील, सौरभ हुलसर, ओमकार पाटील, साईराज कदम यांनी पाटाकडीलच्या गोलक्षेत्रापर्यंत चेंडू नेण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या बचावपटूंनी त्या चढाया परतावून लावल्या. पूर्ण सामन्यावर पाटाकडीलने एकतर्फी वर्चस्व राखत विजयाला गवसणी घातली.
प्रॅक्टीसचा एकतर्फी विजय….
दुपारच्या सत्रातील पहिल्या सामन्यात प्रॅक्टीस क्लबने वर्षाविश्वासवर ५-० असा एकतर्फी विजय नोंदवला. पूर्वार्धात उत्सव मरळकरने २१व्या मिनिटाला संघाला आघाडीवर नेले. उत्तरार्धात मात्र चार गोलची नोंद केली. प्रदीप शिंदेने ४४व्या मिनिटाला संघाचा दुसरा गोल केला. त्यानंतर ५९व्या मिनिटाला सचिन गायकवाडने गोल नोंदवून आघाडी ३-० अशी वाढवली. ७२व्या मिनिटास रोहित भोसलेने गोल करून आघाडी ४-० अशी भक्कम केली. अखेर जादावेळेत अजिंक्य नलवडेने संघासाठी पाचवा गोल नोंदवून विजयावर शिक्कामोर्तब केले. वर्षाविश्वासकडून शिवम लोकरे, कृष्णात मिसाळ, सक्षम नलवडे, शुभम दरवाण यांनी चांगला खेळ केला पण गोलची परतफेड करता आली नाही.
——————————
• दिलबहार – फुलेवाडी : दुपारी ४ वाजता
——————————
पाटाकडील आणि प्रॅक्टीस क्लबचे दणदणीत विजय
RELATED ARTICLES
Mumbai
moderate rain
27.9
°
C
27.9
°
27.9
°
82 %
5.4kmh
98 %
Tue
29
°
Wed
29
°
Thu
29
°
Fri
28
°
Sat
29
°

