Homeशैक्षणिक - उद्योग केडीसीसी बँकेकडे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ३५ कोटींच्या ठेवी जमा

केडीसीसी बँकेकडे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ३५ कोटींच्या ठेवी जमा

• मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे यांची माहिती
कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (केडीसीसी)कडे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विविध ठेव योजनांमध्ये ३५ कोटी ठेवी जमा झाल्या. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. बँकेच्या सर्वच ठेव योजनांना ठेवीदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, असेही या पत्रकात म्हटले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, केडीसीसी बँकेने गुरूवारी (दि.१९) गुढीपाडव्याच्या दिवशीही ठेवी स्वीकारण्यासाठी बँकेच्या केंद्र कार्यालयासह सर्व म्हणजे १९१ शाखा सुरू ठेवल्या होत्या. बँकेकडे सुरू असलेल्या सर्वच ठेव योजनांना चांगल्या व्याजदरामुळे ठेवीदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
केडीसीसी बँकेने आजअखेर रू. ११ हजार कोटी ठेवींचा टप्पा यशस्वीरित्या पार केलेला आहे. चालू आर्थिक वर्षाअखेर बँकेचे रू. १३,००० कोटी ठेवींचे उद्दिष्ट आहे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
few clouds
30.4 ° C
30.4 °
30.4 °
64 %
5.9kmh
20 %
Thu
31 °
Fri
32 °
Sat
32 °
Sun
32 °
Mon
32 °

Most Popular

You cannot copy content of this page