Homeशैक्षणिक - उद्योग जमिनीचे आरोग्य जपल्यास उसाचे विक्रमी उत्पादन शक्य : डॉ. शांतिकुमार पाटील

जमिनीचे आरोग्य जपल्यास उसाचे विक्रमी उत्पादन शक्य : डॉ. शांतिकुमार पाटील

• डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयाच्यावतीने शेतकरी मेळावा
कोल्हापूर :
माती परीक्षणाने जमिनीत नेमकी कोणत्या मूलद्रव्यांची कमतरता आहे हे समजते. त्यामुळे माती परिक्षण व अहवालाकडे दुर्लक्ष न करता किमान तीन वर्षातून एकदा माती परीक्षण करून घेणे गरजेचे आहे. जमिनीचे आरोग्य जपल्यास उसाचे विक्रमी उत्पादन घेणे शक्य असल्याचे प्रतिपादन कृषी शास्त्रज्ञ डॉ. शांतिकुमार पाटील यांनी केले.
तळसंदे येथील डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयाच्यावतीने ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात कृषी शास्त्रज्ञ डॉ. शांतिकुमार पाटील बोलत होते. ‘मातीचे आरोग्य व ए आय तंत्रज्ञान आधारित आधुनिक ऊस शेती’ या विषयावर त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डी. एन. शेलार होते.
डॉ. पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांनी प्रामुख्याने जमिनीच्या सुपीकतेवर काम करणे गरजेचे आहे. त्यासाठी ऊस लागवडीपूर्वी जमिनीमध्ये शेणखत व जैविक खतांचा वापर करावा.
गोकुळचे वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी डॉ. एम. पी. पाटील यांनी ‘दुग्धोत्पादन तंत्रज्ञान’ या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, यशस्वी दुग्धव्यवसायासाठी जनावरांची जात, खाद्य आणि व्यवस्थापन या त्रिसूत्रीवर काम करणे महत्वाचे आहे. जनावरांच्या कोणत्या जाती निवडाव्यात तसेच त्यांना कोणत्या प्रकारचे खाद्य व ते किती प्रमाणात द्यावे आणि त्याचा दूध उत्पादनांवर होणारा परिणाम याबद्दल मार्गदर्शन केले. जनावरांच्या योग्य व्यवस्थापनासाठी मुक्त संचार गोठा पद्धतीचा अवलंब करावा असा सल्ला त्यांनी शेतकऱ्यांना दिला.
या शेतकरी मेळाव्यामध्ये शेतीविषयक कंपन्यांचे तसेच बचत गटांचे स्टॉल लावण्यात आले होते. यावेळी जुने पारगाव, मोहरे, कोडोली, केखले, पोखले, पडळी, अंबप, टोप, किणी व घुणकी या सर्व गावांचे सरपंच, पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
महाविद्यालयाचे शिक्षण प्रभारी प्रा. आर. आर. पाटील, रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. एस. एम. घोलपे, कार्यक्रम अधिकारी  प्रा. माधुरी एन. केंगरे, प्रा. व्ही. व्ही. झरेकर व प्रा. एन. एस. मेकळके यांनी यावेळी मार्गदर्शन केले. सर्व कृषीदुत व कृषीकन्या यांनी नियोजन केले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28.2 ° C
28.2 °
28.2 °
81 %
7.8kmh
100 %
Wed
28 °
Thu
29 °
Fri
28 °
Sat
29 °
Sun
28 °

Most Popular

You cannot copy content of this page