• केएमटी स्वयंपूर्ण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे : सत्यजित जाधव
कोल्हापूर :
कोल्हापूर महानगरपालिका परिवहन समिती सभापतीपदी निवड झाल्यानंतर युवा उद्योजक सत्यजित चंद्रकांत जाधव यांनी तात्काळ कामाला सुरुवात करत परिवहन विभागाचा सविस्तर आढावा घेतला. परिवहन विभागाला उर्जितावस्था देत केएमटीला स्वयंपूर्ण व नफ्यात आणण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
दरम्यान, कोल्हापूर महानगरपालिकेचा परिवहन विभाग सक्षम व स्वयंपूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे सहकार्य करावे, असे आवाहन सभापती सत्यजित जाधव यांनी केले.
महापालिकेच्या परिवहन समिती सभापतीपदी निवड झाल्यानंतर सत्यजित जाधव यांनी गुरुवारी परिवहन कार्यालयास भेट देत विभागातील कामकाजाची माहिती घेतली. यावेळी अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय सरनाईक, प्रकल्प अधिकारी पी. एन. गुरव, ट्रॅफिक अधिकारी नितीन पोवार, लेखा अधिकारी राजेंद्र सूर्यवंशी, खरेदी अधिकारी संजय जाधव, आस्थापन व्यवस्थापक बानू साबळे, वर्कशॉप इन्चार्ज आर. आर. मोरे, प्रदीप म्हेत्तर, दिनेश सोमण, संतोष लोखंडे आदी अधिकाऱ्यांशी त्यांनी सविस्तर चर्चा करून परिवहन विभागाची माहिती घेतली.
यावेळी सत्यजित जाधव म्हणाले, केंद्र व राज्य शासनाकडून मंजूर झालेल्या १०० एसी बसेससाठी पाठपुरावा करण्यात येणार असून केएमटीचा ताफा अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या बसेसनी सुसज्ज करण्याचा प्रयत्न केला जाईल. शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर बससेवा वापरावी यासाठी बसस्थानके स्वच्छ ठेवणे, सेवा दर्जेदार करणे आणि केएमटीचा कारभार सक्षम करणे यावर भर देण्यात येणार आहे. तसेच ठोक मानधनावर काम करणाऱ्या केएमटी कामगारांच्या प्रश्नांवर प्राधान्याने लक्ष देऊन त्यांच्या जीवनात स्थैर्य आणण्यासाठी प्रयत्न केले जातील.
केएमटी बसचालक व वाहकांचा विमा उतरविण्याबाबतही सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन नूतन सभापती सत्यजितजाधव यांनी दिले. हातकणंगले तसेच इचलकरंजी परिसरात केएमटी बससेवा सुरू करण्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार असून, केएमटी विभागाचे उत्पन्न वाढविण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या सोमवारी अधिकाऱ्यांसोबत नियमित आढावा बैठक घेण्यात येणार असल्याचे सत्यजित जाधव यांनी सांगितले.
यानंतर नूतन सभापती जाधव यांनी शास्त्रीनगर येथील केएमटी वर्कशॉपला भेट देऊन स्टोअर, ऑईल, असेंब्ली, डिझेल विभागासह विविध विभागांची पाहणी केली. वर्कशॉपमधील कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेतल्या. यावेळी वर्कशॉपचे सुपरवायझर जगदीश शेंडगे, श्री.मोरे तसेच केएमटी मान्यताप्राप्त संघटनेचे अध्यक्ष सचिन जाधव यांच्यासह कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.
यावेळी सचिन जाधव यांच्या हस्ते नूतन सभापती सत्यजित जाधव यांचा सत्कार करण्यात आला.
परिवहन समितीचे नूतन सभापती सत्यजित जाधव ॲक्शन मोडवर
Mumbai
scattered clouds
29.7
°
C
29.7
°
29.7
°
68 %
5.7kmh
36 %
Sun
30
°
Mon
31
°
Tue
29
°
Wed
30
°
Thu
31
°

