Homeशैक्षणिक - उद्योग डी. वाय. पाटील अभियांत्रिकीचे माजी विद्यार्थी अथर्व पाटीलचे यूपीएससीमध्ये यश

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीचे माजी विद्यार्थी अथर्व पाटीलचे यूपीएससीमध्ये यश

कोल्हापूर :
डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग विभागाचे माजी विद्यार्थी अथर्व संतोष पाटील यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या संयुक्त संरक्षण सेवा परीक्षेत देशात ३२वा क्रमांक मिळवत यश संपादन केले. भारतीय नौदलात सब लेफ्टनंट पदावर त्याची निवड झाली आहे.
संतोष पाटील हे २०२४ बॅचचे विद्यार्थी आहेत. अत्यंत स्पर्धात्मक आणि कठीण मानल्या जाणाऱ्या यूपीएससी सीडीएस परीक्षेत मिळवलेले हे यश महाविद्यालयासाठी अभिमानास्पद आहे. अभियांत्रिकी शिक्षण घेत असतानाच त्यांनी शिस्तबद्ध तयारी आणि जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही संरक्षण क्षेत्रात करिअर करण्याची प्रेरणा मिळणार आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोषकुमार चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे तसेच एआयएमएल विभागप्रमुख डॉ. सिद्धेश्वर पाटील यांनी अथर्व पाटील यांचे अभिनंदन केले.

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
27.8 ° C
27.8 °
27.8 °
82 %
9.2kmh
99 %
Fri
29 °
Sat
29 °
Sun
28 °
Mon
28 °
Tue
28 °

Most Popular

You cannot copy content of this page