कोल्हापूर :
निसर्गात कंदमुळे देणाऱ्या अनेक वनस्पती आहेत.अनेक कंदमुळांच्या वनस्पती या रानावनात, जंगलात वाढतात. अशाप्रकारच्या विविध रानकंदमुळांची ओळख आणि त्यांचा आहारातील वापर याबाबतची माहिती व्हावी व शेतकऱ्यांनी त्यांची लागवड त्यांच्या शेतात करण्याच्या हेतूने आयोजित केले असल्याची माहिती वुई केअरचे प्रमुख मिलिंद धोंड व निसर्गअंकुर संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. मधुकर बाचुळकर यांनी दिली. यावेळी डॉ. अशोक वाली, मोहन माने, गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी, अभिजीत पाटील आदी उपस्थित होते.
ते म्हणाले की, निसर्गअंकुर संस्थेच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर वुई केअर आणि एनजीओ कम्पॅशन २४ या संस्थेच्या आयोजनातून तसेच श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्था, गार्डन्स क्लब, युथ ऍनेक्स, वुई केअर हेल्पलाईन या संस्थांच्या सहकार्याने १४ आणि १५ मार्च रोजी २५०हून अधिक कंदमुळांचे माहितीपूर्ण प्रदर्शन शहाजी कॉलेजच्या यशवंतराव चव्हाण सभागृह, दसरा चौक येथे आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उदघाटन शनिवारी (दि.१४) सकाळी १०:३० वाजता होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, महापौर सौ. रुपाराणी निकम, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, शाहू एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मानसिंग बोंद्रे, शहाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण, मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे, सिद्धगिरी नर्सरीचे सतीश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत होईल.
कंदमुळांचे अभ्यासक मोहन माने यांच्या अथक प्रयत्नातून हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. मानवी आहारात उपयुक्त असणाऱ्या अशा बहुतांश कंदवर्गीय वनस्पतींची शेतात लागवड केली जाते. या प्रदर्शनात कणगा, काटे कणंग, कोराडू, करांदा, वराहकंद, वासकंद, पासपोळी, शेंडवेल, कडुकंद, आळसी, शेवळा, सुरण ह्या वनस्पतींची कंदमुळे, हवाई बटाटे, कंदीका आणि कंदक तसेच मोठा कासार अळू, काळा अळू, हिरवा अळू, पांढरा पेरव, उंडे, शेडवाळे असे अळुंचे विविध प्रकार आणि त्यांचे कंद, त्याचबरोबर काळी हळद, आंबेहळद, रानहळद ह्या सारखे हळदीचे विविध प्रकार व त्यांचे कंद तसेच अमेरिकन अळू, चिनी बटाटे इत्यादी विदेशी कंदमुळे अशाप्रकारच्या सुमारे २५०हून अधिक प्रकारच्या कंदाच्या जाती, प्रजातींची मांडणी केली जाणार आहे.
कंदमुळांपासून विविध खाद्यपदार्थ कसे बनविले जातात, त्याच्या पाककृती या प्रदर्शनात पाहता येतील. तसेच या पदार्थांची चवही चाखता यावी यासाठी हे खाद्यपदार्थ खाण्यासाठी उपलब्ध असतील. काही कंदमुळे विक्रीसाठी ही असतील. रानभाज्या, वृक्ष आणि औषधी वनस्पतींची माहिती असणारी पुस्तके विक्रीसाठी येथे उपलब्ध अस
कोल्हापुरात २५०हून अधिक कंदमुळांचे भव्य प्रदर्शन
Mumbai
light rain
27.8
°
C
27.8
°
27.8
°
82 %
9.2kmh
99 %
Fri
29
°
Sat
29
°
Sun
28
°
Mon
28
°
Tue
28
°

