Homeशैक्षणिक - उद्योग डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण

कोल्हापूर :
न्यू वूमन्स कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे अध्यापन व शिक्षण अधिक प्रभावी व आधुनिक करण्याच्या उद्देशाने “फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम” आयोजित करण्यात आला. यावेळी प्राध्यापकांना डिजिटल तंत्रज्ञानाचा अध्यापनात प्रभावी वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी डॉ. शशिकांत उपाध्ये यांनी मार्गदर्शक म्हणून उपस्थित प्राध्यापकांना सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे प्राध्यापकांना आधुनिक तंत्रज्ञानाचा अध्यापनात प्रभावी वापर करण्याबाबत उपयुक्त माहिती मिळाली.
या कार्यक्रमात अध्यापन आणि शिक्षणासाठी आयसीटी साधनांचा वापर, यूट्यूब वर शैक्षणिक व्हिडिओ तयार करण्याच्या मूलभूत गोष्टी, तसेच सामग्री निर्मितीसाठी कॉपीराइट मुक्त प्रतिमा व संगीताचा वापर याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनमध्ये ॲनिमेशनचा प्रभावी वापर, अत्याधुनिक शैक्षणिक तंत्रे आणि पॉडकास्टिंग या विषयांवर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले.
यासोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून अध्यापन अधिक सुलभ व आकर्षक कसे करता येईल आणि त्यासाठी उपलब्ध असलेली विविध मोफत साधने याविषयीही माहिती देण्यात आली.
कार्यक्रमास विविध महाविद्यालयातील प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
haze
34 ° C
34 °
31.9 °
55 %
5.7kmh
40 %
Sun
32 °
Mon
29 °
Tue
30 °
Wed
30 °
Thu
29 °

Most Popular

You cannot copy content of this page