Homeकला - क्रीडास्नेह संगीत प्रतिज्ञाची सलग ३२०० मैफिल उत्साहात

स्नेह संगीत प्रतिज्ञाची सलग ३२०० मैफिल उत्साहात

कोल्हापूर :
ना नफ्यासाठी.. ना स्वार्थासाठी,
ना पद प्रतिष्ठा आणि सन्मानासाठी, आमची कला गरजवंतांच्या आधारासाठी… हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून नाट्यप्रयोग आणि संगीत मैफिलींच्या माध्यमातून समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या तसेच संकटग्रस्त बंधू-भगिनींना यथाशक्ती आधार देण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोल्हापुरातील प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेच्या स्नेह संगीत प्रतिज्ञा या सांगीतिक उपक्रमातील सलग ३२०० वी गीत मैफिल बुधवारी उत्साहात पार पडली.
विकास प्रतिज्ञा स्टुडिओ येथे ही मैफिल झाली. कर्करोग ग्रस्त गायक सोलापुरे यांच्या अखेरच्या आयुष्यात आनंद देण्यासाठी सुरू झालेल्या या गीत मैफिली आजही रोज, अविरत सुरू आहेत. कोल्हापुरातील साने गुरुजी परिसरात विकास प्रतिज्ञा स्टुडिओ येथून फेसबुक लाईव्हद्वारे या गीत मैफिली होत असतात. या गीत मैफिलीतून गरजवंतांच्या मदतीसाठी रोजच आवाहन केले जाते. यातून मिळणारा निधी थेट गरजू व्यक्तीच्या खात्यावर जमा केला जातो.
सध्या दऱ्याचे वडगाव येथे एचआयव्ही सह जगणाऱ्या महिलांना सन्मानाने जगता यावे याकरिता १२०० स्क्वेअर फुटाच्या पुनर्वसन केंद्राचे बांधकाम प्रतिज्ञा च्या वतीने सुरू आहे. याव्यतिरिक्त दोन गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे आणि दोन रुग्णांना औषध उपचारासाठी मदत देण्याचे काम ही सुरू आहे. रोजच्या मैफिलीद्वारे गेल्या सात वर्षात जवळजवळ ३५ ते ४० लाखांची मदत विविध गरजूंना देण्यात आली आहे.
या उपक्रमातील सलग ३२०० गीत मैफिल सादर झाली. मोहम्मद रफी, किशोर कुमार, मुकेश, लता मंगेशकर, आशा भोसले यांची काही गाजलेली गाणी स्नेह संगीत प्रतिज्ञा चे गायक अमरसिंह राजपूत नीलांबरी जाधव राजेंद्र चौगुले आणि अजय खतकर यांनी सादर केली. निवेदनाची बाजू नीलांबरी जाधव यांनी सांभाळली. संयोजन मिलिंद नाईक, श्रावणी खतकर, जयश्री देसाई, प्रशांत जोशी यांनी केले. यावेळी सहभागी सर्व कलाकारांनी उत्स्फूर्तपणे वर्गणी काढून जमलेली रक्कम एचआयव्हीसह जगणाऱ्या महिलांच्या करिता होत असलेल्या पुनर्वसन केंद्राच्या बांधकामा करिता देऊ केली.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
30.4 ° C
30.4 °
30.4 °
71 %
4.6kmh
7 %
Sat
30 °
Sun
31 °
Mon
30 °
Tue
29 °
Wed
30 °

Most Popular

You cannot copy content of this page