• रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचा फिनलंडच्या फेझर कंपनीसोबत करार
कोल्हापूर :
रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (आरसीपीएल) ने फिनलंडमधील अग्रगण्य खाद्यपदार्थ कंपनी फेझरसोबत करार झाल्याची घोषणा केली आहे. या कराराअंतर्गत भारतीय ग्राहकांसाठी प्रीमियम चॉकलेट आणि कन्फेक्शनरी प्रकारातील खाद्यपदार्थ बाजारात आणले जाणार आहेत.
दोन्ही कंपन्या भारतात दीर्घकालीन धोरणात्मक भागीदारीअंतर्गत फेझरच्या रेसिपी आणि गुणवत्ता मानकांनुसार चॉकलेटचे उत्पादन, विपणन आणि वितरण करणार आहेत. हा करार फिनलंडचे राष्ट्रपती अलेक्झांडर स्टब यांच्या भारत दौऱ्यादरम्यान करण्यात आला.
रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्सचे संचालक टी. कृष्णकुमार यांनी सांगितले की, ही भागीदारी जगातील उत्कृष्ट दर्जाच्या चॉकलेट्स भारतीय ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. त्यांनी सांगितले की, फेझरच्या जागतिक दर्जाच्या ब्रँड आणि उत्पादन कौशल्याला रिलायन्सच्या मजबूत वितरण जाळे व भारतीय बाजारपेठेच्या सखोल समजुतीची जोड मिळाल्याने ग्राहकांना जागतिक दर्जाची उत्पादने उपलब्ध होतील. या भागीदारीअंतर्गत फेझरचे प्रीमियम चॉकलेट ब्रँड्स रिलायन्सच्या देशभर पसरलेल्या सुमारे ३० लाख किरकोळ विक्री केंद्रांच्या नेटवर्कद्वारे बाजारात उपलब्ध केले जाणार आहेत.
विशेष म्हणजे, २०२२ मध्ये स्थापन झालेल्या आरसीपीएलने चॉकलेट आणि कन्फेक्शनरी बाजारपेठेत वेगाने विस्तार केला आहे. कंपनीने भारतातील पारंपरिक रावळगाव, टॉफीमॅन आणि पान-पसंद हे ब्रँड पुन्हा बाजारात आणले आहेत, तसेच लोटस चॉकलेटलाही आपल्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट केले आहे. दुसरीकडे, फेझरची उत्पादने जगातील ४० हून अधिक देशांमध्ये उपलब्ध आहेत.
—————————— ————————-

——————————