Homeइतरराष्ट्रीय तपास यंत्रणेचे पोलीस अधीक्षक प्रवीण इंगवले यांची श्री दत्त कारखान्यास सदिच्छा...

राष्ट्रीय तपास यंत्रणेचे पोलीस अधीक्षक प्रवीण इंगवले यांची श्री दत्त कारखान्यास सदिच्छा भेट

कोल्हापूर :
राष्ट्रीय तपास यंत्रणाचे पोलीस अधीक्षक प्रवीण इंगवले यांनी शिरोळ येथील श्री दत्त साखर कारखान्यास सदिच्छा भेट देत विविध प्रकल्पांची माहिती घेतली.
यावेळी श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी प्रवीण इंगवले यांचे स्वागत केले. कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील व अशोक निर्मळ गुरुजी उपस्थित होते.
या भेटीदरम्यान दत्त कारखान्याच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पाची सविस्तर माहिती सादर करण्यात आली. या प्रकल्पांतर्गत क्षारयुक्त व नापीक जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी विविध वैज्ञानिक व सेंद्रिय उपाययोजना राबविल्या जात आहेत. मातीतील सेंद्रिय कर्ब वाढविणे, जमिनीची रचना सुधारणा, जलसंधारण आणि पर्यावरणपूरक शेती पद्धतींचा अवलंब यावर विशेष भर देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी शाश्वत शेती, सेंद्रिय शेतीचा प्रसार, तसेच एकरी १०० टन उत्पादन या उद्दिष्टावर आधारित प्रयोग व उपक्रमांबाबत सखोल चर्चा झाली. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, उत्पादन खर्च कमी करणे आणि पर्यावरण संतुलन राखणे या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.
प्रवीण इंगवले यांनी प्रकल्पाबद्दल समाधान व्यक्त करत शेती क्षेत्रातील नवकल्पना आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अशा उपक्रमांचे कौतुक केले. तसेच ग्रामीण भागातील विकास आणि शाश्वत शेतीला चालना देणारे प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी असल्याचे सांगितले.

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
29.8 ° C
29.8 °
29.8 °
65 %
5.7kmh
0 %
Thu
31 °
Fri
30 °
Sat
30 °
Sun
30 °
Mon
30 °

Most Popular

You cannot copy content of this page