Homeशैक्षणिक - उद्योग एनआयटीचे टेक्नोरंग २०२६ जल्लोषात

एनआयटीचे टेक्नोरंग २०२६ जल्लोषात

कोल्हापूर :
श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उंचगांव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी (एनआयटी)चे वार्षिक स्नेहसंमेलन टेक्नोरंग २०२६ जल्लोषात संपन्न झाले. सकाळ माध्यम समूह (साऊथ महाराष्ट्र) चे जनरल मॅनेजर यतीश शहा आणि विभागीय वनअधिकारी श्रीकांत पवार यांचे हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
याप्रसंगी संस्थेचे चेअरमन डाॅ. के. जी. पाटील, व्हाईस चेअरमन डी. जी. किल्लेदार, खजाननीस वाय. एस. चव्हाण, संचालक वाय. एल. खाडे, पी. सी. पाटील, सी. आर. गोडसे, सौ. सविता पाटील, प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे, रजिस्ट्रार प्रा. बाजीराव राजिगरे, स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते.
तुमची शिक्षणाची डिग्री करिअर यशासाठी पुरेशी आहे का? असा विद्यार्थ्यांना प्रश्न करतानाच यतिश शहा यांनी भविष्यातील तंत्रकौशल्ये, संभाषण कौशल्ये, जीवनमूल्ये, डिजिटल कौशल्ये आत्मसात करून स्वयंशिस्त व जबाबदारी घेण्याची वृत्ती जोपासत स्वतःचे व्यक्तिमत्व घडविण्याचा सल्ला दिला. आळस झटकून व्यावसायिक वृत्तीने आपल्या ध्येयाच्या दिशेने रोज पावले टाका, असेही त्यांनी सांगितले.
अभियंता म्हणून काम करताना मानव, वन्यजीव व एकूणच पर्यावरण यांच्या सहजीवनाचा समतोल राखण्यासाठी शाश्वत विकासासाठी तंत्रज्ञान विकसित करा, असे विभागीय वन अधिकारी श्रीकांत पवार विद्यार्थ्यांना म्हणाले.
प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे यांनी, वार्षिक अहवाल वाचन करताना एनआयटीमधील तंत्रशिक्षणासोबत भविष्यातील कौशल्यांचे शिक्षण, स्टार्टअप निर्मिती यासंदर्भातील योजनांची माहिती दिली.
चेअरमन डाॅ. के. जी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलचा वेळ कमी करून एखाद्या क्रीडा व कला यासाठी वेळ देण्याचा सल्ला देत शुभेच्छा दिल्या.
उदघाटनानंतर विद्यार्थ्यांनी नृत्य, नाट्य, गायन, वादन यांचे उत्कृष्ट अविष्कार सादर केले. तत्पूर्वी, विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेषभूषा स्पर्धेत खासकरून महाराष्ट्रीयन संस्कृतीचे यथार्थ दर्शन घडवले. तसेच, आठवडाभर विविध क्रीडा स्पर्धा चुरशीने रंगल्या होत्या. विद्यार्थ्यांत खास आकर्षण असलेली जनरल चॅम्पियनशिप ट्राॅफी मुलांमध्ये इलेक्ट्रिकल तर मुलींमध्ये एआयएमएल विभागाने पटकावली. कार्यक्रमाची प्रस्तावना संमेलन प्रमुख प्रा. दिपक जगताप यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. सुहासचंद्र देशमुख यांनी केले.

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
29.8 ° C
29.8 °
29.8 °
68 %
5.2kmh
2 %
Thu
31 °
Fri
31 °
Sat
30 °
Sun
30 °
Mon
29 °

Most Popular

You cannot copy content of this page