कोल्हापूर :
भाजप युवा मोर्चाचे नूतन प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे रविवारी (दि.१) कोल्हापुरात आगमन होत आहे. यानिमित्त त्यांचे करवीरनगरीत दुचाकी रॅलीने जल्लोषी स्वागत करण्याचा निर्धार शुक्रवारी झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी केला आहे. यासंबंधी खासदार धनंजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये दोन हजार दुचाकी स्वारांची रॅली काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
कृष्णराज महाडिक हे गेल्या पाच वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. युथ आयकॉन ठरलेल्या कृष्णराज महाडिक यांचा योग्य सन्मान करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीवेळी सांगितले होते. त्यानुसार प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी कृष्णराज महाडिक यांची युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी निवड केली.
युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेल्या कृष्णराज महाडिक यांचे रविवार १ मार्च रोजी मुंबईहून कोल्हापुरात आगमन होत आहे. त्यांचे जल्लोषी स्वागत करण्याच्या दृष्टीने शुक्रवारी भाजपा कार्यालयात खासदार धनंजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीमध्ये जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी स्वागत रॅलीसंबंधी माहिती दिली. दुपारी ४ वाजता छत्रपती ताराराणी चौकातून कृष्णराज महाडिक यांच्या स्वागत रॅलीला सुरूवात होणार आहे. या रॅलीत २ हजार पेक्षा अधिक दुचाकीस्वारांचा समावेश आहे. शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकात विसर्जित होईल. त्यानंतर सायंकाळी ६ ते ८ या वेळेत कृष्णराज महाडिक पक्ष कार्यालयात शुभेच्छा स्वीकारणार आहेत. या कार्यक्रमात जनतेने उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी केले आहे.
——————————
भाजप युवा मोर्चाचे नूतन प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे आज कोल्हापुरात आगमन
Mumbai
scattered clouds
30.5
°
C
30.5
°
30.5
°
63 %
6kmh
37 %
Wed
31
°
Thu
30
°
Fri
30
°
Sat
31
°
Sun
30
°

